शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

पीएचडी’ संशोधकांना ‘अ‍ॅप’चा आधार

By admin | Updated: January 7, 2017 21:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘ई’ सुधारणांकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. ‘पीएचडी’ संशोधकांसाठी विद्यापीठाने विशेष ‘अ‍ॅप’ तयार केले आहे

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ७ -  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘ई’ सुधारणांकडे आणखी एक पाऊल टाकले आहे. ‘पीएचडी’ संशोधकांसाठी विद्यापीठाने विशेष ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. या ‘अ‍ॅप’च्या मदतीने प्रबंध सादर केल्यानंतर त्याच्या मूल्यमापनाचा वेग व नेमकी स्थिती उमेदवारांना एका ‘क्लिक’वर जाणून घेता येणार आहे हे विशेष.
नागपूर विद्यापीठाच्या ‘पीएचडी’ नोंदणीची प्रक्रिया ‘आॅनलाईन’ झाली आहे. शिवाय ‘पीएचडी’चा दर्जा वाढावा यासाठी विद्यापीठातर्फे ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम) २ टप्प्यांत घेण्यात येत आहे. मात्र प्रक्रियेत जरी सुधारणा झाली असली तरी शोधप्रबंध सादर केल्यानंतर ‘पीएचडी’ संशोधकांचा मन:स्ताप वाढत असल्याचे चित्र दिसून येते. प्रबंधाचे मूल्यमापन कुठपर्यंत आले, प्रबंधाची नेमकी स्थिती काय आहे, बैठकीनंतर कुठले ‘पॅनल’ लागले इत्यादी प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी उमेदवारांना प्रचंड पायपीट करावी लागते. शिवाय विद्यापीठातून त्यांना लगेच उत्तर मिळेल, याचीदेखील शाश्वती नसते. त्यामुळे प्रबंध सादर केल्यानंतरदेखील उमेदवारांवरील तणाव जात कायम राहतो.
हीच बाब लक्षात घेऊन नागपूर विद्यापीठाने एक पाऊल पुढे उचलत आता विशेष मोबाईल ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. ‘आरटीएमएनयू पीएचडी स्टेटस ट्रॅक’ या नावाचे हे ‘अ‍ॅप’ असून हे ‘गूगल प्लेस्टोअर’वर मोफत उपलब्ध आहे. या ‘अ‍ॅप’मुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे व त्यांची पायपीट थांबणार आहे.
 
काय आहे ‘अ‍ॅप’मध्ये ?
संबंधित ‘अ‍ॅप’ हे शोधप्रबंध केलेल्या उमेदवारांच्या समस्या लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. प्रत्येक उमेदवाराला ‘पीएचडी सेल’कडून ‘यूझर नेम’ व ‘पासवर्ड’ देण्यात येणार आहे. त्या मदतीने हे ‘अ‍ॅप’ सुरू केल्या जाऊ शकते. शोधप्रबंध सादर करण्याची दिनांक, त्यानंतर मूल्यमापनाचे पुढील टप्पे, विविध बैठकांमधील निर्णय, परीक्षकांचे ‘पॅनल’, प्रत्यक्ष मूल्यमापनाची स्थिती,  विद्यापीठाच्या अधिसूचना, इत्यादी माहिती उमेदवारांना लगेच उपलब्ध होणार आहे.
 
आणखी सुधारणा करणार : प्र-कुलगुरू
‘पीएचडी’ प्रणाली जास्तीत जास्त पारदर्शक करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्यातूनच या ‘प्रोमार्क’च्या मदतीने ‘अ‍ॅप’ची निर्मिती करण्यात आली आहे. या ‘अ‍ॅप’मुळे ‘पीएचडी’ संशोधकांना शोधप्रबंधाची सर्व माहिती सहज उपलब्ध होणार आहे. शिवाय विद्यापीठाच्या कार्यप्रणालीलादेखील गती येईल. या ‘अ‍ॅप’मध्ये भविष्यात आणखी सुधारणा करण्यात येतील, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.