शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
5
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
6
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
7
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
8
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
9
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
10
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
11
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
12
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
13
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
14
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
15
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
16
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
17
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
18
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
19
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
20
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पोटाला चिमटा घेत यशाची उत्तुंग भरारी

By admin | Updated: June 13, 2015 03:04 IST

माणसाचे पोट भरले तरच स्वप्नही पाहता येतात. गरीबीमुळे अनेकांच्या आयुष्यात भूक भागविण्याचा संघर्षच आयुष्य व्यापून उरतो.

सिमरन वासनिक : पुढच्या शिक्षणासाठी हवाय आधारनागपूर : माणसाचे पोट भरले तरच स्वप्नही पाहता येतात. गरीबीमुळे अनेकांच्या आयुष्यात भूक भागविण्याचा संघर्षच आयुष्य व्यापून उरतो. पण पोटाला चिमटा मारुन आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणारे लोक दुर्मिळच असतात. दोन वेळच्या पोटभर भोजनासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे ओळखलेल्या सिमरनने भूक विसरून दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गूण मिळवित यश खेचून आणले. मानसिक, भावनिक आणि शारीरिक अशा तीनही संघर्षाला तिला सामोरे जावे लागले. पण तिने जिद्द हारली नाही. लहान असतानाच अचानक वडील सोडून गेले. कसाबसा चालणारा संसार उघड्यावर आला. पोटच्या गोळ्यांना आई उपाशी कशी ठेवणार? चार घरी स्वयंपाकाचे काम करून आईने दोन मुलींसह किरायाच्या घरात परिस्थितीशी दोन हात केले. मिळेल ते घरगुती काम करुन सध्या दोन वेळेची भूक भागविण्याइतपतच ती कमावते. कुणाचाही आर्थिक आधार नाही. स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असली तर प्रतिकुलतेतून त्याचे मार्गही सापडतात. परिस्थितीपुढे शरण होणे सोपे असते पण परिस्थितीशी संघर्ष करताना स्वप्नांच्या मागे धावण्याचे ध्येयवेड असले तर परिस्थितीलाही शरण आणता येते. सिमनरने हे करून दाखविले आहे. पाचपावली येथील एस.सी.एस. गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी असलेली सिमरन बालपणापासूनच अभ्यासात हुशार. खडतर परिस्थितीतही तिच्या आईने कुणापुढे लाचारी स्वीकारली नाही. आर्थिक अडचणीमुळे मुलींच्या काही गरजा पूर्ण करता आल्या नाही. सिमरनने तक्रार न करता त्यातून मार्ग काढला. अभ्यास करताना पुस्तके विकत घेण्याचीही ताकद नव्हती. त्यामुळे मैत्रिणींची पुस्तके वापरली. आईच्या कष्टाची जाणीव ठेवून, तडजोड करीत, कधीही कुरबुर न करता तिने अभ्यास केला. सिमरन पहिल्या वर्गापासून शाळेतून प्रथम येत आहे. त्यामुळे शाळेकडून तिला चांगले सहकार्य मिळाले. घरची परिस्थिती लक्षात घेऊन इंजिनिअर फोरमने तिला नि:शुल्क कोचिंग दिली. नियमित आणि सातत्याने अभ्यास करून तिने ९३ टक्के गुण मिळविले. पुढे तिला आयएएस करून प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा आहे. मात्र तिच्या शिक्षणाचा खर्च आईच्या अवाक्याबाहेर आहे. मुलीला शिकवायचे आहे पण पैसा आणायचा कुठून....या विचारानेच त्या माउलीच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत. सिमरन हुशार आहे पण तिचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी हवीय थोडीशी मदत. शिक्षणसाठी तिला समाजातून आधार मिळाला तरच ही गुणवंत सिमरन शिक्षण पूर्ण करु शकेल आणि समाजासाठी सेवा देऊ शकेल. (प्रतिनिधी)