शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बाबा ताजुद्दीन यांचा जन्मोत्सव उत्साहात

By admin | Updated: January 28, 2015 01:06 IST

हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन यांचा १५४ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील रस्त्यांसह, वसाहती आणि चौकांमध्ये बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त आकर्षक देखावे

नागपूर : हजरत बाबा सैयद मोहम्मद ताजुद्दीन यांचा १५४ वा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील रस्त्यांसह, वसाहती आणि चौकांमध्ये बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त आकर्षक देखावे तयार करण्यात आले होते. ठिकठिकाणी केक कापण्यात आले. या दिनानिमित्त ताजबादमध्ये नागपूरसह जबलपूर, सिवनी, मंडला, छिंदवाडा, भोपाळ, हैदराबाद, कोलकाता, मुंबई, सूरत, अहमदाबाद, अदिलाबाद, औरंगाबाद यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आले आहे.बाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्यावतीने विविध धार्मिक कार्यक्रांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी पहाटे ३.३० वाजता परंपरेनुसार या वर्षीही पहिला संदल गोकुळपेठ येथून राणा बाबू यांचा ताजाबाद येथे पोहचला. सकाळी १०.३० वाजता बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या कार्यालयात सूफियाना कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शाही संदल काढण्यात आला. यात मोठ्या संख्येत भाविक सहभागी होते. सायंकाळी ६ वाजता हा संदल परत ताजाबाद येथे पोहचला. ट्रस्टच्यावतीने संदलमध्ये समावेश असलेले चंदनचा लेप आणि शाही चादर समाधीवर चढविण्यात आली. रात्री ८.३० वाजता दरगाहमध्ये कव्वालीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष हाजी शेख हुसैन, सचिव इकबाल वेलजी, कोषाध्यक्ष अ‍ॅड. व्ही. के. फ्रान्सिस, ताजाबाद दरगाह खुद्दाम कमिटीचे अध्यक्ष अब्दुल रज्जाक ताजी प्यारू आदि प्रामुख्याने उपस्थित होते. १५४ किलोचा कापला केकबाबा ताजुद्दीन यांच्या जन्मदिवसानिमित्त ताजबाद दरगाह येथे सायंकाळी ५.१५ वाजता १५४ किलोचा केक कापण्यात आला. यावेळी दरगाह परिसरात असलेल्या भाविकांना या केकचे वितरण करण्यात आले. शहरात या दिनाच्यानिमित्ताने ठिकठिकाणी हिंदू-मुस्लिम एकतेची झलकही दिसून आली. नंदनवन येथे गणेशनगर मित्र परिवाराच्यावतीने महाप्रसाद वितरित करण्यात आला. जुनी शुक्रवारी येथे सर्वधर्मसमभाव समितीच्यावतीने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरभरातून पोहचले संदलशहराच्या विविध परिसरातून काढण्यात आलेले संदल दरबार-ए-ताजुद्दीन येथे पोहचले. पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत संदल येण्याचा क्रम सुरू होता. ताजाबाद ट्रस्टच्यावतीने काढण्यात आलेला संदल आकर्षणाचे केंद्र राहिले. दी बिट्स ग्रुपच्यावतीने काढण्यात आलेल्या संदलमध्ये विविध धर्माच्या लोकांची उपस्थिती लक्ष वेधून घेणारी होती. (प्रतिनिधी)