शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ५५ हजार विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४ डिसेंबरपासून शाळांना सुरुवात झाली, तर महापालिकेच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. ...

नागपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात १४ डिसेंबरपासून शाळांना सुरुवात झाली, तर महापालिकेच्या हद्दीतील शाळा ४ जानेवारीपासून सुरू झाल्या. जिल्ह्यात ९ वी ते १२ वी वर्गातील २,७०,५८३ विद्यार्थी आहेत. शाळा भेट अहवालात आजच्या घडीला ५५,७१० विद्यार्थी शाळेत नियमित उपस्थित राहात आहेत. महापालिकेच्या हद्दीतील सुरू झालेल्या शाळांमध्ये दुसऱ्या दिवशी ८०० विद्यार्थी वाढले.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत १४ डिसेंबरपासून शाळा सुरू केल्या. ग्रामीण भागात ९ ते १२ वीच्या ६४८ शाळा आहेत. यात १,२८,९५५ विद्यार्थी प्रवेशित आहे. यापैकी ४०,८२२ विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित राहात आहेत, तर महापालिकेच्या हद्दीतील ५६३ शाळा सुरू झाल्या आहे. या शाळेत १,४१,६२८ विद्यार्थी आहे. दुसऱ्या दिवशी शहरातील शाळेत १४,८८८ विद्यार्थ्यांची नोंद झाली. शहरातील शाळेच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची चाचणी करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले होते. आतापर्यंत ६८ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरू होऊन २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. दरम्यानच्या काळात कुठल्याही विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झालेली नाही. उलट ग्रामीण भागात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. ग्रामीण भागातून कोरोनाची भीती काहीशी कमी होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी संख्येला प्रवासी व्यवस्थाही कारणीभूत आहे. ग्रामीण भागात नियमित बसेस सुरू झाल्या नाहीत. शहरातील शाळेतसुद्धा विद्यार्थी संख्या वाढेल, अशी अपेक्षा शिक्षकांना आहे.