शहरं
Join us  
Trending Stories
1
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
2
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
3
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
4
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
5
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
6
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
7
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
8
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
9
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
10
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
11
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
12
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
13
आनंदवार्ता ! मान्सून अंदमान, निकोबारमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी एन्ट्री? 
14
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
15
हे दशक आपत्तींचे; ...तर गरिबीच्या खाईत अडकू; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा
16
मुलीसाठी पाच लाखांत पेपर विकत घेतला? सीबीआयकडून नांदेडात पालकांची चौकशी 
17
'पॉलिटिकल स्टार्टअप'चे दिवस! कमल हासन-चिरंजीवी ठरले 'बर्न आउट', तर 'थलपती' विजय बनला लेटेस्ट 'राजकीय युनिकॉर्न'
18
प्रा. मनीषा मांढरे सीबीआयच्या जाळ्यात; पुण्यातील तिसरी अटक
19
साक्रीत दुहेरी हत्याकांड; भोंदू बाबा गजाआड, अघोरी पूजेतून वाद झाल्याने हत्या करून मृतदेह पुरले
20
‘कारकुनी चुकी’मुळेच गोंधळ; पटेल, तटकरे पदावर कायम; अजित पवार गट आता निवडणूक आयोगाला नव्याने पत्र पाठवणार
Daily Top 2Weekly Top 5

यशोधरानगरात चिमुकलीवर अत्याचार

By admin | Updated: May 23, 2014 00:53 IST

यशोधरानगरात एका नराधमाने चिमुकलीसोबत आपले तोंड काळे केले. तर, एमआयडीसीत प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला.

एमआयडीसीत प्रियकराची दगाबाजी : बलात्काराची तक्रार

नागपूर : यशोधरानगरात एका नराधमाने चिमुकलीसोबत आपले तोंड काळे केले. तर, एमआयडीसीत प्रियकराने लग्नास नकार दिल्यामुळे एका तरुणीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप लावला. यशेधरानगरात एक सहा वर्षीय चिमुकली आपल्या अंगणात खेळत असताना संजय मुरलीधर केसुकर (वय ३५, रा. किनखेडे ले-आऊट) याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून आपल्या घरात नेले. तेथे तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. मुलगी घरी परतल्यानंतर तिची अवस्था पाहून तिच्या आईने विचारणा केली असता चिमुकलीने नराधम संजय केसुकरचे नाव सांगितले. संतप्त आईकडून या घटनेची शेजार्‍यांना माहिती कळाल्यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला. मोठ्या संख्येत नागरिक आरोपीच्या घरावर गेले. दरम्यान, माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कलम ३७७ तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करून नराधम संजय केसुकरला अटक केली. प्रियकराने झिडकारले मंगेश रमेश जुनघरे (रा. जयताळा) याचे परिसरातील एका तरुणीसोबत (वय २१) तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आरोपी जुनघरे पानटपरी चालवतो तर, मुलगी एका फूटवेअरमध्ये कामाला आहे. तिची आई रोजमजुरी करते. मुलीची आई घराबाहेर गेल्यानंतर हे दोघे परस्पर संमतीने शरीरसंबंध प्रस्थापित करीत होते. ‘आपण लग्न करू’ असे जुनघरेने सांगितल्यामुळे तीन वर्षात त्यांच्यात अनेकदा शरीरसंबंध जोडले गेले. आता मात्र जुनघरेने लग्नास नकार दिला. त्यामुळे तिने एमआयडीसी पोलिसांकडे धाव घेऊन त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. पीएसआय प्रशांंत पाटणकर यांनी आरोपीविरुद्ध कलम ३७६, ४१७ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे. कहानी मे टिष्ट्वस्ट बलात्काराचा गुन्हा दाखल होताच जुनघरेने कोलांटउडी घेतली. तक्रार मागे घे, आपण लगेच लग्न करू, असे त्याने सदर तरुणीला सांगितल्याचे समजते. त्यामुळे तरुणी पुन्हा पोलिसांकडे पोहचली. तक्रार परत घ्यायची आहे, असे ती पोलिसांकडे सांगू लागली. त्यामुळे पोलीसही चक्रावले. गुन्हा दाखल केल्यामुळे आता ‘तुला जे काही करायचे आहे, ते कोर्टातूनच करावे लागेल’,असे सांगून पोलिसांनी तिला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. (प्रतिनिधी)