शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
2
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
3
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
4
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
5
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
6
'तुझे प्रेमसंबंध संपव'; आईच्या प्रियकराची मुलीच्या प्रियकराकडून निर्घृण हत्या, पुणे हारदरलं
7
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
8
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
9
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
10
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
11
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
12
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
13
Top Marathi News Live: अमूलचं दूध महागलं! उद्यापासून खिशाला बसणार कात्री
14
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
15
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
18
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
19
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
20
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

फर्टिलायझर कंपनीत बुरखाधाऱ्यांचा सशस्त्र दरोडा

By admin | Updated: May 9, 2014 01:39 IST

फर्टिलायझर कंपनीच्या चौकीदाराला सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी चाकुच्या धाकावर खोलीत डांबून ठेवले व ७५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

नांदगाव पेठ पोलीस ठाण्यासमोरील घटना : चाकुचा धाक दाखवून चौकीदाराला डांबले
श्‍वान व ठसेतज्ज्ञ पथक रित्या हाताने परतले
अमरावती : फर्टिलायझर कंपनीच्या चौकीदाराला सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी चाकुच्या धाकावर खोलीत डांबून ठेवले व ७५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्यासमोरील संजय खोडके यांच्या मालकीच्या अंबा फर्टिलायझर कंपनीत गुरुवारी मध्यरात्री १.३0 वाजता ही खळबळजनक घटना घडली. वासुदेव नारायण जवंजाळ (६५, रा. कठोरा गांधी) असे डांबून ठेवलेल्या चौकीदाराचे नाव आहे.
संजय खोडके यांची नांदगाव पेठ पोलीस ठाण्यासमोर रासायनिक खतांची कंपनी आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हा कारखाना बंद आहे. याठिकाणी वासुदेव जवंजाळ व पंजाबराव जयराम कांबळे (६२, रा. नांदगाव पेठ) हे दोन सुरक्षा रक्षक आहेत.
घटनेच्या दिवशी वासुदेव जवंजाळ कारखान्यात होते. मध्यरात्री १.३0 वाजताच्या दरम्यान सहा बुरखाधारी दरोडेखोरांनी एक्स्प्रेस हायवे मार्गाने कंपनीत प्रवेश केला. दरोडेखोर ३५ ते ४0 वयोगटातील होते. दोघांनी चाकुचा धाक दाखवून वासुदेव जवंजाळ यांना खोलीत डांबून ठेवले. उर्वरित दरोडेखोरांनी कंपनीच्या बाहेर लावलेल्या ट्रान्सफार्मरचे तार तोडून शंभर किलो तांबा तार व शंभर लिटर ऑईल असा एकूण ७५ हजार रुपयांचा माल चोरुन पहाटे ३ वाजता घटनास्थळावरुन पळ काढला. (प्रतिनिधी)
अडीच तास ठेवले डांबून
दरोडेखोरांनी चौकीदार वासुदेव जवंजाळ यांना अडीच तास डांबून ठेवले. दरोडेखोर पळून जाताच घाबरलेले वासुदेव हे नांदगाव पेठ येथील बस थांब्याजवळ आले. त्यांनी या घटनेची माहिती एका व्यक्तीच्या भ्रमणध्वनीवरुन त्यांचे सहकारी पंजाबराव कांबळे यांना दिली. त्यानंतर पोलिसांना सूचना दिली. पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक पोलीस आयुक्त साखरकर, गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, नांदगाव पेठचे पोलीस निरीक्षक लटपटे, महेश ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
■ रासायनिक कारखान्यात दरोडा घातल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी घटनास्थळाला भेट दिली. श्‍वानपथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. परंतु नुकताच पाऊस येऊन गेल्याने श्‍वान पथक भरकटले. त्यामुळे दोन्ही पथक रिक्त हस्ते परतले. ग्रामीण पोलिसांनी पकडली होती ट्रान्सफॉर्मर फोडणारी टोळी
■ शहरासह जिल्ह्यात अँम्बुलन्सचा वापर करुन ट्रान्सफॉर्मर फोडणार्‍या टोळीचा काही महिन्यांपूर्वी ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला होता. दोन भंगारवाल्यांसह यवतमाळ व नेर येथील प्रत्येकी तीन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून पोलिसांनी मंगरुळ दस्तगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील पाऊणे तीन लाख रुपयांचा मालही जप्त केला होता. या टोळीतील काही सदस्य जामिनावर सुटल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या टोळीचा या घटनेशी काही संबंध आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. टोल नाक्यावरील फुटेज तपासले
■ आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश ठाकूर यांनी नांदगाव पेठ टोल नाक्याला भेट दिली. मध्यरात्री १.३0 ते पहाटे ४ वाजेपर्यत नाक्यावरुन ये-जा करणार्‍या वाहनांचे फुटेज तपासले. परंतु दरोडेखोरांनी दरोड्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर केला, हे स्पष्ट होऊ शकले नाही.