शेजाऱ्यांमधील वाद पेटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:09 IST2021-06-09T04:09:35+5:302021-06-09T04:09:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. त्यानंतर एका गटाने दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरावर हल्ला ...

An argument broke out between the neighbors | शेजाऱ्यांमधील वाद पेटला

शेजाऱ्यांमधील वाद पेटला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - शेजाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. त्यानंतर एका गटाने दुसऱ्या शेजाऱ्याच्या घरावर हल्ला चढवून त्यांना जोरदार मारहाण केली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ जूनच्या रात्री ही घटना घडली.

अजनीतील हनुमाननगरात मनीष आनंद त्रिवेदी (वय ४३, सामाजिक कार्यकर्ता) आणि रवींद्र भजनघाटे हे एकमेकांशेजारी राहतात. त्यांच्यात दोन वर्षांपासून कुरबुरी सुरू आहे. ४ जूनच्या सायंकाळी त्यांच्यात असाच वाद सुरू झाला अन् नंतर तो वाढत गेला. आरोपी रवींद्र भजनघाटे, सुनील शंकरराव भजनघाटे, तन्मय, कुणाल, मयूर भजनघाटे तसेच त्यांच्या साथीदारांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्रिवेदी आणि त्यांच्या मुलांना लाकडी दांड्याने मारहाण करून जबर जखमी केले. शिवीगाळ करून धमकीही दिली. त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हल्ला केल्याच्या आरोपाखाली भजनघाटे आणि साथीदारांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.

---

Web Title: An argument broke out between the neighbors