शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

मनपात ऐवजदारांच्या नियुक्तीत घोळ

By admin | Updated: May 18, 2016 03:09 IST

महापालिकेच्या आरोग्य विभागातील ऐवजदारांच्या नियुक्त्या लाड कमिटीच्या शिफारशीनुसार केल्या जातात.

नियम धाब्यावर बसविले : अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीवर शंका नागपूर : महापालिकेच्या आरोग्य विभागातील ऐवजदारांच्या नियुक्त्या लाड कमिटीच्या शिफारशीनुसार केल्या जातात. परंतु अनुकंपा तत्त्वावर करण्यात आलेल्या नियुक्त्यांत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आरोग्य विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र प्रदेश सफाई कामगार महासंघाचे नागपूर विभागाचे प्रमुख कि शोर समुद्रे यांनी अनुकंपा तत्त्वावर करण्यात आलेल्या ऐवजदारांच्या नियुक्त्यांत घोळ असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. नियुक्तीत घोळ झाल्यासंदर्भात आवश्यक पुराव्यासह फेब्र्रुवारी महिन्यात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परंतु विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने हा घोळ झाला असल्याने अद्याप या प्रकरणाची चौकशी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अनिल दशरथ चुटेलकर व गणेश घनश्याम बेहुनिया यांच्या नियुक्त्या संशयास्पद आहेत. दिवंगत इंदल वारल्या पांडे यांच्या जागेवर त्यांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती मिळविली आहे. वास्तविक मृताशी त्यांचे कोणत्याही स्वरूपाचे रक्ताचे नाते नव्हते. झोन क्र मांक ६ मधील वॉर्ड क्रमांक १२७ मध्ये पांडे ऐवजदार म्हणून कार्यरत होते. १९९३ सालापासून ते ड्युटीवर जात नव्हते. त्यामुळे त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी लावण्यात आली होती. परंतु पांडे हे २५ फेब्रुवारी २००४ ला सेवानिवृत्त झाल्याचे सांगण्यात आले. वास्तविक पांडे यांचा चौकशी अहवाल २३ जानेवारी २००९ रोजीचा दर्शविण्यात आला आहे. अहवाल येण्यापूर्वी सेवानिवृत्त कसे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पांडे यांनी गणेश बेहुनिया यांना २९ नोव्हेंबर २००६ रोजी नोकरी देण्याबाबतचे संमतीपत्र दिले होते. त्यानंतर बेहुनिया यांनी १८ फेब्रुवारी २०१२ ला नोकरीसाठी दिलेला अर्ज रद्द करण्याबाबत पत्र दिले. २००९ मध्ये पांडे यांचा मृत्यू झाला. परंतु बेहुनिया यांनी १८ फेब्रुवारी २०१२ रोजी अनिल चुटेलकर यांना नोकरीसाठी संमतीपत्र दिल्याचे दर्शविले आहे. त्यानुसार ७ सप्टेंबर २०१५ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पांडे यांना मूलबाळ नव्हते. ज्यांना नोकरी मिळाले, ते त्यांचे नातेवाईक नसल्याचा आरोप समुद्रे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)