शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

अन् मेहमूदला मिळाली जगण्याची उमेद

By admin | Updated: November 19, 2016 03:05 IST

एकदा रु ग्ण मनोरु ग्णालयात दाखल झाला की, श्वास थांबेपर्यंतचं आयुष्य दगडी भिंतीच्या मागे असते, आजही अनेकांचा असाच समज आहे.

प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या प्रयत्नाला यशनागपूर : एकदा रु ग्ण मनोरु ग्णालयात दाखल झाला की, श्वास थांबेपर्यंतचं आयुष्य दगडी भिंतीच्या मागे असते, आजही अनेकांचा असाच समज आहे. परंतु गुरुवारी हा समज खोटा ठरला. प्रादेशिक मनोरुग्णालयात महिन्याभरापूर्वी अनोळखी रुग्ण म्हणून शेख मेहमूद दाखल झाला. त्यावेळी त्याला बोलताही येत नव्हते. परंतु डॉक्टरांच्या योग्य उपचाराने तो बरा झाला. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर संपर्क साधण्यात आला. आज बायको, पोराला समोर पाहताच त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. त्याला जगण्याची नवी उमेद मिळाली होती. बकरी ईदच्या निमित्ताने कामाच्या ठिकाणाहून घरी जायला निघालेला मेहमूद आजारपणाने संभ्रमित झाला. सौंसर येथून आपल्या गावी सिंधी (पातालकोट), जिल्हा छिंदवाडा येथे जाण्याऐवजी नागपुरात भटकत राहिला. गंभीर मानसिक आजारामुळे आपले नाव व पत्ता सांगण्याच्या स्थितीतही मेहमूद नव्हता. त्याचे बोलणेच बंद झाले होते. महिन्याभरापूर्वी कोतवाली पोलिसांनी मेहमूदला पकडून प्रादेशिक मनोरुग्णालय नागपूर येथे दाखल केले. मनोविकार व बधिरीकरण तज्ज्ञानी उपचाराची दिशा ठरविली. विशेष म्हणजे, त्याला दिलेल्या विद्युत कंपन उपचाराचा परिणाम दिसून येऊ लागला. न बोलणारा मेहमूद बोलू लागला. त्याने आपला पत्ताही सांगितला. मनोरुग्णालयातील सामाजिक कार्यकर्ता यांनी त्याच्या पत्त्यावर संपर्क साधला. आज गुरुवारी समोर पत्नी, मुलाला व नातेवाईकाना पाहून मेहमूदला गहिवरून आले. जगण्याची उमेद हरवलेल्या मेहमूदला रुग्णालयामुळे जगण्याचे बळ आणि स्वकीय मिळाले होते. जाताना तो सर्व डॉक्टरांना भेटला. इतर रुग्णांनाही माझ्यासारखे लवकर बरे करून घरी पाठवा, अशी विनंती करीत होता. (प्रतिनिधी)