शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी सीमांकनाच्या वादात पट्टे वाटप अडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

गणेश हूड लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरातील मिश्र मालकीच्या व सरकारी जागेवरील झोपडपट्टी वसाहतीतील जमिनीच्या सीमांकनाचा ...

गणेश हूड

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर शहरातील मिश्र मालकीच्या व सरकारी जागेवरील झोपडपट्टी वसाहतीतील जमिनीच्या सीमांकनाचा वाद निर्माण झाल्यामुळे झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे वाटपाचे काम अधांतरी आहे. नगर भूमापन विभागामार्फत संबंधित जागेची मोजणी करण्यात येत नसल्याने हा प्रश्न जटील झाला आहे. चकरा मारूनही कायम पट्टे मिळत नसल्याने झोपडपट्टीधारक हतबल झाले आहेत.

नागपूर शहरात शासन, नागपूर सुधार प्रन्यास,महापालिका व खासगी या मिश्र मालकीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांतील विभागवार जागांचे सीमांकन व मोजणी करण्यासाठी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाकडून शुल्काची अट पुढे करण्यात येत आहे. शासनाच्या निर्णयानुसार ज्या विभागाच्या मालकीच्या जमिनीवर झोपडपट्टी वसली आहे, त्याच शासकीय विभागावर मालकीपट्टे वाटप करण्याची जबाबदारी आहे. परंतु, मिश्र मालकी असलेल्या जमिनीवरील झोपडपट्ट्यांतील पट्टे वाटपाचा मुद्दा सीमांकनाअभावी अनिर्णयावस्थेत आहे.

या झोपडपट्ट्यातील झोपडीधारकांचे अतिक्रमण नेमक्या कोणात्या विभागाच्या मालकीच्या जागेवर आहे, हे निश्चित करण्यासाठी नगर भूमापन विभागाकडून त्या जागेची मोजणी करण्यात येत नाही, तो पर्यंत मिश्र मालकीच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांत पट्टे वाटप शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महापालिका व नासुप्रच्या जागेवरील झोपडपट्टी वसाहतीत सर्वेक्षणानंतर मालकी पट्टे-रजिस्ट्री प्रक्रिया सुरू आहे. परंतु, शासकीय मालकी व मिश्र मालकीच्या जागेवरील पट्टे वाटप ठप्प आहे.

शासनाने हा प्रश्न तातडीने निकाली काढून मिश्र व सरकारी जमिनीवरील झोपडपट्ट्यामध्ये पट्टे वाटप सुरू करावे , अशी मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक, डॉ. दिलीप तांबटकर, राजकुमार वंजारी, रामदास उईके, विमल बुलबुले व शैलेंद्र वासनिक यांनी केली आहे.