शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा वाढणार पेट्रोल-डिझेलच्या किमती? ट्रम्प यांनी केली भारतासह जगाची चिंता वाढवणारी घोषणा
2
इंधनाच्या तुटवड्यावरून पेट्रोल पंपांवरच जोरदार हाणामारी; पोलीस समोरच होते तरीही...
3
खळबळजनक! रात्री कलिंगड खाल्लं, सकाळी मुलाचा मृत्यू; एकाच कुटुंबातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक
4
"गंगा नदीचे पाणी मिळेल तरच...!" ३० वर्षे जुन्या फरक्का करारावरून बांगलादेशची रडारड; भारतही स्पष्टच बोलला
5
राजधानी एक्स्प्रेसला लागली भीषण आग, दिल्लीहून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली  
6
मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट
7
"घटस्फोटाची प्रक्रिया संपेपर्यंत काम करणार नाही...", प्रसिद्ध अभिनेत्याचा कौटुंबिक वाद चव्हाट्यावर
8
घटसर्प आजार नेमका काय आहे? मालेगावातील दोन चिमुकल्यांच्या मृत्युनंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
9
महाराष्ट्रात सरकारी नोकर भरती प्रक्रियेचा कायापालट ! 'बकेट सिस्टीम'चा आधार! कालबाह्य ११०० नियमांना फाटा
10
IPL 2026च्या पॉईंट्स टेबलमध्ये खरी उलथापालथ आज होणार, पंजाबचं भवितव्य ठरणार, सोबतच...
11
सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड, संपत्ती पाहून तपास यंत्रणाही हादरली; एवढा पैसा आला तरी कुठून?
12
PM Modi: मोदींच्या नेदरलँड्स दौऱ्यात मोठी घोषणा, गुजरातमध्ये उभारणार अत्याधुनिक सेमीकंडक्टर प्लांट!
13
"राजा शिवाजी बघण्याआधीच बाबा गेले...", दिशा परदेशीची खंत, म्हणाली- "ते लोकांना फोन करून सांगत होते की..."
14
तुरुंगात असूनही भोंदू अशोक खरातला जॅकपॉट; सिंहस्थ रिंगरोड भूसंपादनातून ३ कोटी मिळणार
15
'दुष्काळात तेरावा' नाही, यंदा सुख-समृद्धीचा १३ वा महिना! 'ज्येष्ठ अधिकमास' सुरू; सण-उत्सव २० दिवस लांबणीवर
16
दोन देशात जीवघेण्या विषाणूचा कहर, WHO अलर्टवर, घोषित केली हेल्थ इमर्जन्सी
17
IPL 2026: कोलकाता- गुजरात सामन्याची इतिहासात नोंद; T20 मध्ये पहिल्यांदाच असं घडलं!
18
आजचे राशीभविष्य - १७ मे २०२६, नोकरी - व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील
19
मौनी रॉय अन् सूरज नांबियारचं पॅचअप? घटस्फोट जाहीर केल्यानंतरही पुन्हा केलं एकमेकांना फॉलो
20
विकी कौशलच्या वाढदिवशी कतरिनाची भावुक अन् मजेशीर पोस्ट, छोट्या विहानचीही दिसली झलक
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांच्या गिचमिड हस्ताक्षरातील अहवाल बाद

By admin | Updated: May 20, 2014 00:58 IST

डॉक्टरांनी आपल्या गिचमिड हस्ताक्षरात दिलेला न्यायवैद्यक व शवविच्छेदन अहवाल यापुढे बाद केला जाणार असून संबंधित डॉक्टरांनी टंकलिखित वा संगणकीकृत अहवालच

डॉक्टरांना आदेश : टंकलिखित वा संगणकीकृत अहवाल निर्गमित करावा

वर्धा : डॉक्टरांनी आपल्या गिचमिड हस्ताक्षरात दिलेला न्यायवैद्यक व शवविच्छेदन अहवाल यापुढे बाद केला जाणार असून संबंधित डॉक्टरांनी टंकलिखित वा संगणकीकृत अहवालच पोलिसांना द्यावा, असे निर्देश राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. सर्व न्यायवैद्यक अहवाल हातांनी न लिहिता ते संगणकीकृत वा टंकलिखित असावे. तसेच ते न्यायवैद्यक सॉफ्टवेअरद्वारे तयार केले जावे अशी मागणी त्यांनी या याचिकेद्वारे केली होती. या याचिकेचा संदर्भ देऊन शासनाच्या आरोग्य विभागाने सदर आदेश निर्गमित केला आहे. डॉक्टरांचा शवविच्छेदन अहवाल व इतर न्यायवैद्यक अहवालावरील न समजणार्‍या हस्ताक्षरांमुळे न्यायालय व फौजदारी न्यायप्रक्रियेत गफलत होते. महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्रामचे सहप्राध्यापक व फॉरेन्सिक मेडिसीन युनिटचे प्रमुख (क्लिनिकल) डॉ. खांडेकर यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहीत याचिका दाखल केली होती. या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार यापुढे कोणत्याही परिस्थितीत शवविच्छेदन अहवाल हस्तलिखित स्वरूपात निर्गमित करण्यात येणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच सदर सूचनांची अमंलबजावणी डॉक्टरांकडून काटेकोरपणे करण्यात येत असल्याबाबत खात्री करून तसा अहवाल आरोग्य संचालनालयास सादर करण्याचे निर्देश शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्हा चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व महानगरपालिकेच्या रूग्णालयांना दिले आहेत. यापूर्वीच्या सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याचे वकील विजय पटाईत यांनी डॉ. खांडेकरांच्या अभ्यासपूर्ण अहवालाचा दाखला दिला होता. डॉक्टरांनी दिलेले बरेच न्यायवैद्यकीय अहवाल खराब हस्ताक्षरांमुळे वाचता येत नाही व ते समजून घेण्यात पोलिसांचा, सरकारी पक्ष आणि न्यायालयांचा बराच वेळ वाया जात असल्याचे त्यांनी नमूद केले होते.(जिल्हा प्रतिनिधी)