एमआयडीसी परिसरातून ॲक्टिव्हा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:11 IST2021-07-14T04:11:34+5:302021-07-14T04:11:34+5:30

कळमेश्वर : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील चाैकात असलेल्या जिमसमाेरून चाेरट्याने ॲक्टिव्हा चाेरून नेली. त्या ॲक्टिव्हाची किंमत २५ हजार रुपये आहे. ...

Activa Lampas from MIDC premises | एमआयडीसी परिसरातून ॲक्टिव्हा लंपास

एमआयडीसी परिसरातून ॲक्टिव्हा लंपास

कळमेश्वर : शहरालगतच्या एमआयडीसी परिसरातील चाैकात असलेल्या जिमसमाेरून चाेरट्याने ॲक्टिव्हा चाेरून नेली. त्या ॲक्टिव्हाची किंमत २५ हजार रुपये आहे. ही घटना गुरुवारी घडली असून, नुकतीच तक्रार दाखल करण्यात आली.

नंदकुमार माणिकराव काेठे (५२, रा. बेलेकार ले-आऊट, कळमेश्वर) यांचा मुलगा रितेश हा गुरुवारी सकाळी एमएच-४०/बीझेड-६७१७ क्रमांकाच्या ॲक्टिव्हाने एमआयडीसी परिसरातील चाैकात असलेल्या जिममध्ये गेला हाेता. त्याने ती ॲक्टिव्हा जिमसमाेर उभी ठेवली हाेती. दरम्यान, कुणाचेही लक्ष नसताना चाेरट्याने लाॅक उघडून ती ॲक्टिव्हा चाेरून नेली. त्यांनी सुरुवातीला परिसरात शाेध घेतला. ती कुठेही आढळून न आल्याने पाेलिसात तक्रार दाखल केली. शिवाय, त्या ॲक्टिव्हाची किंमत २५ हजार रुपये असल्याचे त्यांनी पाेलिसांना सांगितले. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास सहायक फाैजदार नारनवरे करीत आहेत.

Web Title: Activa Lampas from MIDC premises