९ प्रतिष्ठानांवर कारवाई,६३ हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:08 IST2021-03-14T04:08:10+5:302021-03-14T04:08:10+5:30

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शनिवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, ...

Action against 9 establishments, fine of Rs. 63,000 recovered | ९ प्रतिष्ठानांवर कारवाई,६३ हजारांचा दंड वसूल

९ प्रतिष्ठानांवर कारवाई,६३ हजारांचा दंड वसूल

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शनिवारी ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ७८ प्रतिष्ठान व मंगल कार्यालयांची तपासणी केली. शारीरिक अंतर न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत सात मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत पाच कार्यालयांची तपासणी केली. नियम मोडणाऱ्यांना ३५हजार दंड केला. हनुमाननगर झोन येथील सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार दंड केला. धंतोली झोनअंतर्गत सात मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. नेहरूनगर झोनमधील ११ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमधील आठ प्रतिष्ठानांची, लकडगंज झोनअंतर्गत १४ प्रतिष्ठानांची, आशीनगर झोनमध्ये १२ प्रतिष्ठानांची तपासणी केली. मंगळवारी झोनमधील १८ प्रतिष्ठानांची तपासणी करून १०हजार दंड वसूल केला.

Web Title: Action against 9 establishments, fine of Rs. 63,000 recovered