शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

१० प्रतिष्ठानांवर कारवाई, ६० हजारांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:08 IST

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी १० प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव ...

नागपूर : नागपूर महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी १० प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६० हजारांचा दंड वसूल केला. दरम्यान, उपद्रव पथकाने शहरातील ९७ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. शारीरिक अंतर न पाळणाऱ्यांकडून दंड वसूल केला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार, उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांनी ही कारवाई केली. लक्ष्मीनगर झोनअंतर्गत ८ मंगल कार्यालयांची तपासणी करण्यात आली. धरमपेठ झोनअंतर्गत सहा प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार रुपये दंड वसूल केला. हनुमाननगर झोन येथील पाच प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. धंतोली झोनअंतर्गत ८ मंगल कार्यालये व लॉनची तपासणी करण्यात आली. ५ हजार दंड वसूल केला. नेहरूनगर झोनमधील १३ प्रतिष्ठानांची तपासणी करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमधील ९ प्रतिष्ठानांची तपासणी करून १० हजार दंड वसूल केला. लकडगंज झोनअंतर्गत ११ प्रतिष्ठानांची तपासणी करून पाच हजार दंड वसूल केला. आशीनगर झोनमध्येही १४ प्रतिष्ठाने तपासून १० हजार रुपये दंड केला. मंगळवारी झोनमधील १६ प्रतिष्ठानांची तपासणी करून ५ हजार दंड वसूल करण्यात आला.