शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

मृत्युपूर्व बयानातील त्रुटींमुळे आरोपी निर्दोष

By admin | Updated: March 27, 2015 01:56 IST

केवळ त्रुटींमुळे मृत्युपूर्व बयान अविश्वासार्ह ठरून नंदनवन झोपडपट्टीतील एका तरुणाच्या खुनातील तिन्ही आरोपींना संशयाचा लाभ मिळून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली.

नागपूर : केवळ त्रुटींमुळे मृत्युपूर्व बयान अविश्वासार्ह ठरून नंदनवन झोपडपट्टीतील एका तरुणाच्या खुनातील तिन्ही आरोपींना संशयाचा लाभ मिळून त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांच्या न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. अमित राजेंद्र शेंडे (२५), असे मृताचे नाव होते. तो नंदनवन झोपडपट्टीतील रहिवासी होता. राकेश नागदिवे, गोलू ऊर्फ सौरभ डांगे आणि मोनू सोमकुंवर सर्व रा. नंदनवन झोपडपट्टी, अशी आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षानुसार या प्रकरणाची हकीकत अशी की, अमित हा आपला मित्र कार्तिक वानखेडे याच्यासोबत १५ डिसेंबर २०१२ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपला नातेवाईक मंगेश बारसागडे याच्या घराकडे जात असताना या तिन्ही आरोपींनी त्याला थांबवले. गुप्तीने वार करून आणि हातबुक्कीने मारहाण करून आरोपी पळून गेले होते. जखमी अवस्थेत अमित हा बारसागडेच्या घरी लपून बसला होता. रात्री २ वाजताच्या सुमारास नंदनवन पोलिसांनी बारसागडेचे घर गाठून जखमी अमितला मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल केले होते. या प्रकरणाचे तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक सुनील तिवारी आणि उपनिरीक्षक एस.बी. बोबडे यांनी अमितचे मृत्युपूर्व बयान नोंदवले होते. राकेशने गुप्ती आणि अन्य दोघांनी हातबुक्कीने मारल्याचे त्याने सांगितले होते. हे सर्व जण आपणास शिवीगाळ करीत होते. शिवीगाळ का करता, असे विचारले असता त्यांनी आपणावर हल्ला केला, असेही त्याने मृत्युपूर्व बयानात सांगितले होते. बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयाच्या असे निदर्शनास आणून देण्यात आले की, मृत्युपूर्व बयानासाठी दंडाधिकारी किंवा तहसीलदाराला पत्र देऊन पाचारण करण्यात आले नव्हते. तो बयान देण्यास सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेण्यात आले होते. त्यावर बयान नोंदवण्याची वेळ २.४० आणि बयान संपल्याची वेळही २.४०, अशी नोंदवण्यात आली होती. तपास अधिकारी जयस्वाल यांनी आपल्या साक्षीत अमितला इस्पितळात दाखल करण्याची वेळ ३.३०, अशी सांगितली होती. ‘स्टेशन डायरी’वरही हीच नोंद करण्यात आली होती. बचाव पक्षाचे म्हणणे ग्राह्य ठरवून संशयाचा लाभ देत न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने अ‍ॅड. राम मासूरके, अ‍ॅड. चेतन ठाकूर आणि अ‍ॅड. खंडारे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)