शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून फरार आरोपीस पकडले

By admin | Updated: August 21, 2016 03:25 IST

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात २००६ पासून फरार असलेल्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांच्या विशेष चमूने सिनेस्टाईल अटक करून

नागपूर : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात २००६ पासून फरार असलेल्या आरोपीस लोहमार्ग पोलिसांच्या विशेष चमूने सिनेस्टाईल अटक करून न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली आहे.नागपूर रेल्वेस्थानकावर २००६ मध्ये प्लॅटफार्म क्रमांक २ वर प्रणय अजय हाडके (३०) रा. खामला जुनी वस्ती या आरोपीने मोटोरोला कंपनीचा १२ हजार रुपये कंपनीचा मोबाईल चोरल्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भादंवि ३७९ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर हजर केले होते. २००६ मध्ये न्यायालयाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली होती. तेव्हापासून २०१६ पर्यंत आरोपी फरार होता. नुकताच न्यायालयाने आरोपीचा पकड वॉरंट जारी केल्यामुळे लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर यांनी आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष चमू तयार केली. या चमूने मागील दोन महिन्यापासून आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. दरम्यान शनिवारी २० आॅगस्ट २०१६ रोजी लोहमार्ग पोलिसांची चमू आरोपीच्या राहत्या पत्त्यावर गेली. त्यांनी आरोपीच्या कुटुंबीयांना विचारपूस केली असता तो घरात नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. परंतु पोलिसांना तो घरात असल्याची शंका आली. आरोपीला आवाज दिला असता तो त्याच्या घराच्या मागच्या दरवाजाने पळून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो आपल्या घराच्या छतावर चढला. पोलीसही छतावर चढले असता तो वस्तीतील एका छतावरून दुसऱ्या छतावर सिनेस्टाईल उड्या मारून पळण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास अटक केली. त्याची न्यायालयाने तुरुंगात रवानगी केली आहे. (प्रतिनिधी)