शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

Nagpur: पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांकडून रेल्वेत शिस्तीचे अनोखे प्रदर्शन, कसलाही वाद नाही, कुठेही राडा नाही

By नरेश डोंगरे | Published: October 26, 2023 10:25 PM

Nagpur: निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले.

- नरेश डोंगरे नागपूर - निळी टोपी, उपरणे अन् पंचशील ध्वज घेऊन तीन दिवसांत नागपुरात सुमारे पावणेदोन लाख भीमसैनिक आले. दीक्षाभूमीवर त्यांनी माथा टेकवला अन् वैचारिक सोने लुटले. पवित्र दीक्षाभूमीवरून समतेचा संदेश घेऊन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ते आले तसे निघूनही गेले. एवढ्या मोठ्या संख्येत विविध मार्गाने येऊन कोणत्याच रेल्वेगाडीत अथवा रेल्वे स्थानकावर कसला राडा झाला नाही की कुणाचे काही चोरीला गेले नाही. विशेष म्हणजे, सलग ५०-५५ तासांचा या पावणेदोन लाख भीमांच्या लेकरांचा बंदोबस्त रेल्वेच्या अवघ्या दीडशे पोलिस, जवानांनी सांभाळला.

रक्ताचा एकही थेंब न सांडवता अभूतपूर्व सामाजिक- वैचारिक क्रांती घडविणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावण स्मृतींना नमन करण्यासाठी तसेच वैचारिक सोने लुटण्यासाठी दसऱ्याला दरवर्षी दीक्षाभूमीवर देश-विदेशातून लाखो भीमसैनिक येतात. कुणी विमानाने, कुणी खासगी वाहनाने तर कुणी चक्क दुचाकींनी येथे येतात. प्रवासासाठी बाबांची सर्वाधिक लेकरं रेल्वे गाड्यांचा वापर करतात. दसऱ्याच्या एक दिवसांपूर्वीपासून ते दीक्षाभूमीवर दाखल होतात अन् दसऱ्याच्या दिवशी मुख्य कार्यक्रम संपला की, परतीची वाट धरतात. याही वर्षी सोमवारी २३ ऑक्टोबरपासून विविध रेल्वेगाड्यांनी त्यांचे नागपुरात आगमन सुरू झाले.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, अहमदाबाद, पुरी, हावडा, गीतांजली, ज्ञानेश्वरी, महाराष्ट्र, विदर्भ, सेवाग्राम, दुरांतो, गरीब रथ या रेल्वेगाड्यांनी सर्वाधिक भीमसैनिक नागपुरात आले. विशेष म्हणजे, मुंबई ते नागपूर दोन आणि पुणे ते नागपूर एक अशा तीन स्पेशल ट्रेन भीमसैनिकांनी भरून नागपुरात आल्या. अर्थात २३ आणि २४ ऑक्टोबर या दोन दिवसांत सुमारे ८० ते ९० हजार प्रवासी नागपूरच्या मुख्य आणि अजनी रेल्वे स्थानकांवर उतरले. तेवढ्याच संख्येत २५ ऑक्टोबरच्या पहाटेपासून त्यांनी आपापल्या गावांचा मार्ग धरला. मात्र, एवढ्या प्रचंड संख्येत येणे-जाणे करणाऱ्या बाबांच्या या अनुयायांनी प्रवासादरम्यान कुठेही कसलीही अनुचित घटना घडणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली.

उल्लेखनीय असे की, गर्दी कशाचीही असो, बंदोबस्तासाठी पोलिसांचे प्रचंड मनुष्यबळ तैनात करावे लागते. २३, २४ आणि २५ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस प्रचंड गर्दी अनुभवणाऱ्या नागपूर रेल्वे स्थानकावर जीआरपी (लोहमार्ग)चे ४ अधिकाऱ्यांसह केवळ ८० पोलिस तर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) केवळ ६५ जवान बंदोबस्तासाठी तैनात होते.

एक सिंगल तक्रारही नाही!या तीन दिवसांत एवढ्या प्रचंड प्रमाणात नागपूर स्थानकावर गर्दी होती. मात्र, कुठेच काही गडबड, गोंधळ झाला नाही. कुणाचे काही चोरीला गेले नाही किंवा काही हरवलेही नाही. आमच्याकडे एक सिंगलही तक्रार आली नाही, असे रेल्वेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा काशिद सांगतात. 

टॅग्स :nagpurनागपूरDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी