शाळेत जाते सांगून घरातून निघालेली अल्पवयीन मुलगी पोहचली थेट अहिल्यानगरमध्ये; चंदेरी स्वप्न दाखवून सत्य आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 18:23 IST2026-02-26T18:22:26+5:302026-02-26T18:23:33+5:30
Nagpur : शाळेत जाते, असे सांगून घरातून निघालेली इयत्ता १० वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ना शाळेत पोहोचली, ना सायंकाळी घरी परतली काळजाचा तुकडा अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला पोलिसही शोधकार्यात लागले.

A minor girl who left home saying she was going to school reached Ahilyanagar directly; The truth came to light by showing dream
लोकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : शाळेत जाते, असे सांगून घरातून निघालेली इयत्ता १० वीत शिकणारी अल्पवयीन मुलगी ना शाळेत पोहोचली, ना सायंकाळी घरी परतली काळजाचा तुकडा अचानक गायब झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला पोलिसही शोधकार्यात लागले. तब्बल ३५ दिवसांनंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने भिवापूर पोलिसांनी अखेर बेपत्ता मुलीचा शोध लावला. रविवार (दि. २२) रोजी अत्यंत गोपनीय पद्धतीने अहिल्यानगर गाठून, पोलिसांनी आरोपीच्या ताब्यात तावडीतून पीडित मुलीला अपहरणाच्या गुन्ह्यात अत्याचार व पोक्सो कलमांची वाढ करून, आरोपीला अटक करण्यात घेतले. आली. विशाल नवनाथ फपले उर्फ फपाले (३४, रा. जाचकवाडी, ता. अकोले जि. अहिल्यानगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गत १९ जानेवारी रोजी पीडित अल्पवयीन मुलगी नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून निघाली. मात्र, सायंकाळ उलटूनही ती घरी परतली नाही. पालकांच्या तक्रारीवरून २० जानेवारी रोजी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. महिनाभरापासून पोलिसांचे पथक मुलीचा शोध घेत होते. परंतु, कुठलेच धागेदोरे हाती लागत नव्हते. दरम्यान, ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत, पीडित मुलीचा ठावठिकाणा शोधला. त्यानुसार रविवार (दि. २२) रोजी उपनिरीक्षक विजय माळी व सचिन उरकुडे यांच्या सहभागातील पथकाने थेट अहिल्यानगर गाठून, मुलीला ताब्यात घेतले आणि आरोपीला अटक केली. सोमवार (दि. २३) रोजी पीडित मुलीला भिवापूर येथे आणल्यानंतर वैद्यकीय तपासणीसह तिचे जबाब नोंदवण्यात आले. आरोपीने तिच्यावर अत्याचार केल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी दाखल गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१), ६४ (२) (प), ६४ (२) (उ), ६९ सह पोक्सो कायद्याच्या कलम ४ (१), ८, १२, १७ अन्वये वाढ करून आरोपीला अटक केली.
चंदेरी स्वप्न दाखवून ओढले जाळ्यात
सोशल मीडियाच्या आभासी दुनियेत आधी ओळख करून नंतर चंदेरी स्वप्न दाखवून तिला जाळ्यात ओढले. अल्पवयीन असल्याने ती अगदी सहजरित्या फेसबुक, इन्स्टाग्रामवरील स्वप्नांच्या बेधुंद धुंदीत अडकली. मात्र, अहिल्यानगर येथे पोहोचल्यावर आरोपीचे खरे रूप, घरदार, तिथला माहौल पाहून तिच्या स्वप्नांचा चुराडा झाला. एकाकी आणि असहाय्य झालेल्या पीडितेला तेथून परतणे अशक्य वाटू लागले. मात्र, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलिस दलात रूजू केलेली अत्याधुनिक हायटेक प्रणाली निर्णायक ठरली. लोकेशन, सीडीआर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अचूक तांत्रिक माहितीमुळे पीडितेचा ठावठिकाणा लागला. ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अहिल्यानगर गाठले आणि पीडितेची नराधमाच्या तावडीतून सुखरूप सुटका केली.
आरोपीला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी
अटकेतील आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला २६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे तपासाला आता वेग येणार असून, अनेक प्रश्नांची उकल होणार आहे. १६ वर्षीय पीडित मुलगी अहिल्यानगरपर्यंत कशी पोहोचली? ती एकटी होती की, सोबत कोणी होते? प्रवासासाठी लागणारे पैसे कोठून मिळाले? या प्रकरणात अन्य कोणाचा सहभाग किंवा कोणाचे मदतीचे हात आहेत का? अशा विविध पैलूंचा तपास पोलिस करत आहेत.