शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

वानाडोंगरी : ग्रा.पं.च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकून ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर ...

वानाडोंगरी : ग्रा.पं.च्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकून ७५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील पेठ कालडोंगरी येथे घडली आहे. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी रामभाऊ सर्वेलाल पवार (७५) यांच्या तक्रारीवरून बाल्या बावणे, दीपक करवा, पुरुषोत्तम सोनवाणे (तिघेही रा. पेठ, ता. नागपूर) व मनोहर येलेकार (रा. धामना) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामभाऊ सर्वेलाल पवार (७५) यांनी पेठ (कालडोंगरी) ग्रा.पं. निवडणुकीसाठी वॉर्ड क्रमांक २ मधून अनुसूचित जमाती प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्याविरोधात प्रतिस्पर्धी गटातून एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. रामभाऊ पवार हे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंद्रपूर रिठी (पेठ कालडोंगरी) येथील घरी असताना बाल्या बावणे त्यांच्याकडे गेला. त्याने रामभाऊ यांना निवडणूक चिन्ह घेण्यासाठी गावात चल असे सांगत सोबत घेतले. यानंतर बाल्याने रामभाऊ यांना मोटारसायकलवर बसवून धामणा येथे देशी दारूच्या भट्टीवर नेले. तिथे मनोहर येलेकार, दीपक करवा, पुरुषोत्तम सोनवाणे उपस्थित होते. त्यांनी रामभाऊ यांना तुझी सुनही निवडणुकीत उभी असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सांगितले. यानंतर चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला, असे रामभाऊ यांनी तक्रारीत म्हटले आहे. यानंतर या चौघांनी रामभाऊ यांना पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये जबरदस्तीने बसवीत नागपूर येथील तहसील कार्यालयात आणले. या गाडीत दीपक करवा आणि बाल्या बावणे होते. येलेकार आणि सोनवाणे हे दुसऱ्या गाडीने तहसील कार्यालयात पोहोचले.

तहसील कार्यालयात आल्यावर जबरदस्तीने अर्ज मागे घेण्यास मला बाध्य करण्यात आले. उमेदवारी अर्ज मागे घेताना निवडणूक अधिकाऱ्यांनी मला मुलाबाबत विचारणा केली असता बाल्या याने मीच मुलगा असल्याची खोटी माहिती अधिकाऱ्यांना दिली, असे रामभाऊ यांनी पोलीस तक्रारीत म्हटले आहे. याच काळात रामभाऊ यांचा मुलगा गुड्डू पवार हा वडिलांना घरी सोडून द्या, असे सांगण्यासाठी चौघांना वारंवार फोन करीत होता. मात्र त्यांनी ऐकले नाही. या घटनेच्या काही काळानंतर गुड्डू पवार आणि गावातील इतर मंडळी तहसील कार्यालयात पोहोचली. त्यांना रामभाऊ यांनी घडलेला प्रकार सांगितला.

यानंतर रात्री ९ वाजताच्या सुमारास हिंगणा पोलीस स्टेशनला या प्रकरणाची रामभाऊ यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी उपरोक्त चारही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३६३ आणि १७१-सी अन्वये गुन्हा दाखल करीत बाल्या बावणे, दीपक करवा, व मनोहर येलेकार (रा. धामना) यांना ताब्यात घेतले आहे. या अपहरणासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल आणि कार क्रमांक एम.एच.३१/ ई.के. ६२८६ जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात एपीआय जीवन भातकुले करीत आहेत.