शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

६० टक्के परीक्षार्थी ‘एआयपीएमटी’ला गैरहजर

By admin | Updated: July 26, 2015 03:16 IST

केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्टमध्ये ...

नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्यावतीने (सीबीएसई) घेण्यात आलेल्या अखिल भारतीय प्री-मेडिकल टेस्टमध्ये (एआयपीएमटी) नागपूर केंद्रावर सरासरी ६० टक्के विद्यार्थी गैरहजर दिसून आले. विद्यार्थ्यांच्या या अनुपस्थितीवर परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनीही आश्चर्य व्यक्त केले. या परीक्षेसाठी नागपुरात एकूण ४२ केंद्रे सज्ज करण्यात आली होती. त्यावर एकूण २५ हजार विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु या केंद्रावर सुमारे ७० ते ८२ टक्के विद्यार्थी गैरहजर होते. परंतु यावर सीबीएसईच्या नागपूर येथील परीक्षा नियंत्रण कार्यालयातर्फे कोणत्याही प्रतिक्रीया देण्यास नकार दिला. मात्र काही अधिकाऱ्यांच्या मते, ‘एआयपीएमटी’चा अपवाद वगळता इतर सर्व राष्ट्रीय व राज्यस्तरीय मेडिकल प्रवेश पूर्व परीक्षा व संबंधित प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेला गैरहजर दिसून आले. विशेष म्हणजे, नागपुरातील परीक्षा केंद्रावर देशभरातील विद्यार्थी परीक्षा देणार होते. परंतु सर्वच ठिकाणी मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने बाहेरचे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचले नाही. परीक्षार्थीच्या या गैरहजरीने परीक्षेतील स्पर्धा कमी झाली आहे. दुसरीकडे पालकांच्या मते, सीबीएसईच्या कठोर नियमांमुळे अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहे.अनेक विद्यार्थ्यांना नागपूरपासून सुमारे २५ किलो मीटरवर परीक्षा केंद्रे देण्यात आली होती. असे असताना परीक्षा केंद्रांवर पाच मिनिटे उशिरा पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जात होता. अशाप्रकारे काटोल रोडवरील एका सीबीएसई शाळेतील परीक्षा केंद्रावर २५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची विनंती केली. परंतु त्याचा काहीही फायदा झाला नाही. परीक्षा नियंत्रण कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मते, यासंबंधी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रावर सर्व सुचना देण्यात आल्या होत्या. त्यावर सकाळी ९.३० वाजतानंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. असे असताना विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्रवेश केंद्रावर सकाळी ७.३० वाजतापासून प्रवेश दिला जात होता. अशा स्थितीत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्राला दोष देता येणार नाही, असे ते म्हणाले.