शहरं
Join us  
Trending Stories
1
‘चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का ?’ राज ठाकरेंचं पत्र, केंद्र सरकारला प्रश्न
2
Top Marathi News LIVE Updates: हिमंता बिस्वा सरमा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
3
Tamil Nadu Politics: अण्णा द्रमुकमध्ये फूट, षण्मुगम गटाने TVK ला दिला पाठिंबा, तामिळनाडूत मोठी उलथापालथ
4
जगात युद्धाचा भडका, अन् चीनची गुपचूप 'धान्य साठेबाजी'; भारतासाठी धोक्याची घंटा?
5
Ashok Kharat : भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ
6
अल्पवयीन प्रियकर-प्रेयसीला पकडलं, अमानुषपणे केस कापले अन् संपूर्ण गावातून धिंड काढून लावलं लग्न!
7
Pragya Singh Missing Case: ट्रेनमधून गायब झालेली नवरी सापडली, नवऱ्याच्या जीवात जीव आला! आता रेल्वे प्रशासन म्हणते.. 
8
हिमंता बिस्वा सरमांच्या शपथविधीसाठी एकनाथ शिंदे गुवाहाटीमध्ये, सरमांच्या नेतृत्वाचं कौतुक करत म्हणाले...  
9
भारतात पेट्रोलचा साठा संपणार? इंधनावर कोटा लागू होणार का? केंद्र सरकारने दिलं मोठं उत्तर
10
Prajakta Mali: प्राजक्ता माळीच्या कुटुंबात कोण कोण? अभिनेत्रीने शेअर केला फॅमिली फोटो
11
काय? राकेश बापटसोबत तेजश्री प्रधानच्या लग्नाची उडालेली अफवा, अभिनेता म्हणतो...
12
लग्नानंतर १४ व्या दिवशी नववधूचा मृत्यू; नवरा म्हणतो, "माझ्याशी मजा-मस्करी करत होती, अन्..."
13
जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश
14
रुपयाची ऐतिहासिक घसरण; डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर, जाणून घ्या महत्त्वाची कारणं
15
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
16
Video - "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
17
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
18
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
19
शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी घसरण; आयटी शेअर्सना मोठा फटका, सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये
20
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

६०९ स्कूल बसला रेड सिग्नल

By admin | Updated: September 28, 2016 03:17 IST

अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे परिवहन विभागाने आदेश दिले होते.

आरटीओने केले परवान्यांचे निलंबन : रस्त्यावर दिसताच बस रोखण्याच्या सूचना
नागपूर : अपघाताच्या घटना व तांत्रिक बिघाड टळून विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी स्कूल बसेसची फेरतपासणी करण्याचे परिवहन विभागाने आदेश दिले होते. याला मुदतवाढही देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही तपासणीसाठी न आलेल्या व योग्य कारणे न दिलेल्या ६०९ स्कूल बसच्या परवान्यांचे निलंबन करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) नागपूर ग्रामीणने घेतला आहे. या बसेसचे नंबर प्लेट क्रमांक व इतर माहिती मंगळवारी वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. रस्त्यावर ही वाहने दिसताच अटकवून ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

स्कूल बसच्या फेरतपासणीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावूनही ज्यांनी कारणे दिली नाहीत किंवा योग्य उत्तरे दिली नाही त्यांच्या स्कूल बसच्या परवान्यांचे निलंबन रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-शरद जिचकार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

न्यायालयाचा आदेश व परिवहन विभागाच्या सूचनेनुसार शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी दरवर्षी करणे बंधनकारक केले आहे़ उन्हाळी सुट्यांच्या कालावधीत फेरतपासणी करण्याबाबत परिवहन विभागाने २७ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार प्रत्येक आरटीओ व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात १ मे ५ जून या कालावधीत ही तपासणी बंधनकारक करण्यात आली.

६६९ बसेसची फेर तपासणी
नागपूर : बसेसच्या तपासणीसाठी कोणतेही शुल्क न घेता मोटार वाहन निरीक्षकाद्वारे वाहनांची तपासणी केली जाणार होती. यात वाहनाचा रंग, स्कूलबसवर नावाची नोंद, शाळेचे नाव, बसच्या पायरीची नेमून दिलेली उंची या शिवाय धोक्याचे इशारे देणारी प्रकाश योजना, वेग नियंत्रक, दरवाजा उघडण्यासाठी हँडल, आपत्कालीन दरवाजा, चालकास आपत्कालीन परिस्थितीची माहिती होण्याकरिता सूचना मिळण्याची सोय अशा एकूण १५ ते २० नियमांची पूर्तता करणाऱ्या बसला फिटनेस प्रमाणपत्र दिले जाणार होते. परंतु सुरुवातीला मिळालेल्या अत्यल्प प्रतिसादानंतर १५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, त्यानंतरही फारसा प्रतिसाद मिळाला नाही.नागपूर ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १२७८ स्कूल बसची नोंद आहे. यातील ६६९ बसेसची फेर तपासणी झाली. उर्वरित ६०९ बसेसला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. परंतु यातील काहींनी योग्य कारण न दिल्याने व काहींनी याला उत्तरच न दिल्याने या सर्व स्कूल बसच्या परवान्यांचे निलंबन करण्याचा निर्णय कार्यालयाने घेतला आहे. आरटीओच्या वायु पथकाला या बसेस जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.