शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
3
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
4
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
5
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
6
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
7
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
8
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
9
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
10
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
11
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
12
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
13
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
14
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
15
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
16
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
17
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
18
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
19
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
20
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या नावावर ५६ लाखांची फसवणूक

By admin | Updated: May 12, 2014 01:05 IST

दुबई (शारजाह) येथे हॉटेल उघडून देण्याचे आमिष दाखवून डाक विभागातील एका सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या मुलीला ५६ लाख रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

नागपूर : दुबई (शारजाह) येथे हॉटेल उघडून देण्याचे आमिष दाखवून डाक विभागातील एका सेवानिवृत्त अधिकारी व त्यांच्या मुलीला ५६ लाख रुपयांचा चुना लावण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. अंबाझरी पोलिसांनी मंगलोर येथील चार आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सुरजबाबू गौडा कोटीयान, अजयबाबू गौडा कोटीयान, चंद्रशेखर उपाध्याय आणि कृष्णानंद उपाध्याय अशी आरोपीची नावे आहेत. शांतिनगर येथील ६६ वर्षीय शेख अजीज शेख जुम्मन डाक विभागात सहायक पोस्ट मास्तर जनरल पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांची मुलगी तसमीन कौशर या दुबईतील बँकेत अधिकारी आहे. दुबर्इंमध्ये काम करीत असताना तसमीन यांची आरोपींसोबत ओळख झाली. आरोपींनी तसमीनला हॉटेलच्या व्यापारात खूप लाभ असल्याचे सांगून भागीदारीमध्ये हॉटेल उघडण्याचे आमिष दाखविले. तसमीन त्यांच्या आमिषाला बळी पडली आणि तिने शारजाह येथे हॉटेल उघडण्याची योजना आखली. तसमीनने आपल्या वडिलांनाही ही योजना सांगितली. मुलीची इच्छा असल्याने वडीलही राजी झाले. शेख अजीज यांनी २९ आॅगस्ट २००९ रोजी आरोपींना कर्नाटक बॅँकेच्या गांधीनगर शाखेतून ६ लाख रुपये दिले. यानंतर १ मे २०१० दरम्यान त्यांनी १३ लाख ५० हजार रुपये आरोपीला दिले. या दरम्यान तसमीननेसुद्धा आरोपीला दुबईच्या इमीरेट एनडीडी बँकेतून २ लाख ८५ हजार ३०८ दिरहम (दुबईचे चलन) दिले. याप्रकारे शेखअजीज आणि तसमीन यांनी आरोपीला एकूण ५६ लाख ३७ हजार ४५० रुपये दिले. काही दिवसानंतर आरोपींनी शारजाह येथे हॉटेल उघडले. सूत्रानुसार सुरुवातीला हॉटेल चांगले चालले. लाभ होत असल्याने आरोपींची नियत बिघडली. त्यांनी लाभाचे पैसे आपल्याजवळ ठेवून घेतले. यानंतर योग्य व्यवस्थापन होत नसल्याने हॉटेल डबघाईस आले. त्यामुळे आरोपींनी हॉटेल दुसर्‍याला विकून टाकले. तसमीनला याची माहितीसुद्धा होऊ दिली नाही. हॉटेल विकून मिळालेले पैसे घेऊन आरोपी भारतात परत आले. गेल्या वर्षभरापासून तसमीन आणि तिचे वडील गुन्हा दाखल करण्यासाठी भटकत होते. त्यांनी भारतीय दूतावासासह अनेक ठिकाणी तक्रार दाखल केली आहे. दोन देशांचे प्रकरण असल्याने पोलिसांसमोरही प्रश्न उभा आहे. रविवारी अंबाझरी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)