शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला ५० कोटी मिळणार

By admin | Updated: November 29, 2015 03:36 IST

स्थानिक संस्था कर (एलबीटी)च्या मोबदल्यात महापालिकेला मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात येणार आहे.

महापालिकेला दिलासा : एलबीटी अनुदानात वाढनागपूर : स्थानिक संस्था कर (एलबीटी)च्या मोबदल्यात महापालिकेला मिळणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर महापालिकेला जानेवारी २०१६, दर महिन्याला ४९.९८ कोटी अनुदान मिळणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करणाऱ्या महापालिकेला दिलासा मिळणार आहे.१ आॅगस्ट २०१५ पासून राज्यातील २५ महापालिकांतील एलबीटी हटविण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. या मोबदल्यात महापालिके ला ५४ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा होती. परंतु ३१ कोटीचे अनुदान मिळत होते. याचा विकासावर परिणाम झाल्याने पदाधिकारी व प्रशासनाने राज्य सरकारकडे वाढीव अनुदानाची मागणी केली होती.दरम्यान पेट्रोल-डिझेलवरील एलबीटी रद्द केल्याने महापालिकेला पेट्रोलवरील एलबीटीपासून वर्षाला मिळणारे ५५ कोटी तर आॅईलवरील ५ कोटीचे असे ५५ ते ६० कोटी वर्षाला मिळत होते. हे उत्पन्न मिळणार नसल्याने राज्य सरकारकडून या मोबदल्यात आर्थिक मदतीची महापालिका प्रशासनाला आशा होती. एलबीटी रद्द झाल्याने महापालिकेला आधीच १५० कोटीचा फटका बसला होता. त्यात पुन्हा ६० कोटीची भर पडल्याने हा आकडा २१० कोटीवर गेला होता. परंतु अनुदानात वाढ होणार असल्याने महापालिकेला दिलासा मिळाला आहे. अनुदान स्वरुपात महापािलेकेला वर्षाला राज्य सरकारकडून ६०० कोटी प्राप्त होणार आहे. मागील वर्षात मनपाला एलबीटीपासूून ३४६ कोटी मिळाले होते. या वर्षी जुलैपर्यंत १५२ कोटीचे उत्पन्न मिळाले. मार्च २०१६ पर्यंत ४५० कोटीची अपेक्षा होती. परंतु सरकारकडून ६०० कोटी मिळणार असल्याने शहरातील विकास कामांना गती मिळण्याला मदत होणार आहे. एलबीटी रद्द केल्यानंतर महापािलकेची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने पदाधिकारी व अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. राज्य सरकारकडून वाढीव अनुदान मिळणार असल्याने बिकट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्याला मदत होणार आहे. शहरातील रस्त्यांच्या कामांना गती मिळेल. कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळण्याची आशा आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने उपराजधानीची वाटचाल सुरू असून विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहे. या प्रकल्पात महापालिकेचाही वाटा असल्याने हा निधी उभारताना प्रशासनाला तारेवरील कसरत करावी लाग होते. परंतु वाढीव अनुदान मिळणार असल्याने प्रशासनाची ही चिंता लवकरच मिटणार आहे.(प्रतिनिधी)