शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

५ महिन्यात ७२९.१५ कोटी

By admin | Updated: September 2, 2016 02:55 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झपाट्याने होत असतांना नागपूर जिल्हा आणि शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्याने होत आहे

पालकमंत्री बावनकुळे : मुख्यमंत्री फडणवीस व गडकरी यांच्यामुळेच केंद्र-राज्याकडून निधी उपलब्धनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास झपाट्याने होत असतांना नागपूर जिल्हा आणि शहराचा विकासही तेवढ्याच झपाट्याने होत आहे. देशाच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या आणि शहराच्या विकासात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे या जिल्ह्यात विकास गंगा वाहून विकासाला वेगळी दिशा मिळाली. केंद्र व राज्य शासनाकडून नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासाठी ७२९.१५ कोटी रुपयांचा निधी गेल्या ५ महिन्यात विविध विकास कामांसाठी या जिल्ह्याला मिळाला असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.मागील १५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून नागपूर जिल्ह्यात विकास कामांचा मोठा बॅकलॉग होता. या जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष देण्यात आले नाही. जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिला नाही. त्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील आणि शहरातील विविध विकास कामांसाठी प्रचंड निधीची व्यवस्था करून दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबंधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रस्त्यांची अनेक कामे नागपूर जिल्ह्यातच नव्हे विदर्भातही रस्त्यांचे जाळे विणले आहे. नागपूरच्या या दोन विकास पुरुषांनी एकत्रपणे मिहानला चालना दिली. एम्स, आयआयआयटी, नॅशनल लॉ स्कूल, आयआयएम, सेंट्रल पॉवर इन्स्टिट्यूट, पतंजली फूड पार्क असे मोठे प्रकल्प आणले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेला वेग दिला. मेट्रो रेल्वे, मेट्रो रिजन आराखडा या प्रकल्पांना मुख्यमंत्री फडणवीस व नितीन गडकरी यांच्यामुळे वेग मिळाला आहे. शहर आणि जिल्ह्यात प्रचंड विकास कामे सुरू आहेत, याचा लोकांना अनुभव येत आहे.नागपूर शहराची जिल्हा नियोजन समिती ही दोन वर्षात ३५० कोटींची झाली. या समितीला एवढा निधी कधीच मिळाला नाही. केवळ मुख्यमंत्र्यांमुळेच हा निधी उपलब्ध झाला. या निधीशिवाय अन्य योजनांसाठी कोट्यवधींचा निधी या दोन विकास पुरुषांनी नागपूरला उपलब्ध करून दिला आहे.तसेच शहरातील व जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या सहकार्यामुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे जिल्ह्याच्या व शहराच्या विकासाला चालना मिळाली आहे. शहरातील आमदार सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. प्रा. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. गिरीश व्यास, आ. नागो गाणार, जिल्ह्यातील आ. आशिष देशमुख, आ. सुधीर पारवे, आ. समीर मेघे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी हे सर्व आमदार विकास कामांसाठी निधी खेचून आणून आपल्या मतदार संघात विकास कामे करुन राज्याचा विकासाचा वेग वाढवण्यास मदत करीत आहेत, याकडे पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष वेधले.जिल्ह्याला नुकतेच १४.५० कोटींचे विशेष व वैशिष्ट्यपूर्ण अनुदान मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंजूर केले. तसेच १२ नगर परिषदा व ५ नगर पंचायतींना १८ कोटी शासनाने मंजूर केले. जिल्ह्यातील या आमदारांच्या सहकार्यानेच हे अनुदान मंजूर होऊ शकले, असेही पालकमंत्री बावनकुळे म्हणाले. (प्रतिनिधी)