शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

४४४ शेतकऱ्यांचे सावकारी कर्ज माफ

By admin | Updated: January 1, 2016 04:27 IST

नागपूर जिल्ह्यातील नागपूर, उमरेड, काटोल, हिंगणा, मौदा, कळमेश्वर, रामटेक, सावनेर, कुही, पारशिवनी, नरखेड या ११

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील नागपूर, उमरेड, काटोल, हिंगणा, मौदा, कळमेश्वर, रामटेक, सावनेर, कुही, पारशिवनी, नरखेड या ११ तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकांराकडून घेतलेल्या कर्जास शासन निर्णयानुसार ४४४ शेतकऱ्यांच्या ९४ लाख २१ हजार ८१४ रकमेला कर्ज माफी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यांनी येथे दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीची बैठक गुरुवारी पार पडली. यावेळी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रतिनिधी डी.बी. गोतमारे, जिल्हा उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी मिलिंद आटे, सहायक निबंधक टी.एन.चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, आर.एन. वसू, चैतन्य नासरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)आतापर्यंत जिल्ह्यात ६२६९ शेतकऱ्यांचे कर्ज माफ४नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत २८१ सावकारांकडून ६२६९ शेतकऱ्यांनी घेतलेले १० कोटी ८८ लाख ८७ हजार ४७९ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. ज्या शेतकरी कर्जदारांचे कर्ज रक्कम समितीने मंजूर केली आहेत त्या कर्जदारांचे दागिने परत करण्यासाठी तालुका निबंधकांनी ५ जानेवारी २९१६ रोजी सावकाराची सभा घेऊन दागिने परत करण्यासाठी मोहीम राबवावी. तसेच परवानाधारक सावकारांनी गहाण वस्तू परत केलेल्या नाहीत, अशा सावकाराची माहिती जिल्हा समितीला कळवावी. ज्या कर्जदार शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले आहे, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजुरी झाल्याचे लेखी कळवावे. गहाण वस्तू परत करतांना कर्जदार शेतकरी हाच खरा शेतकरी आहे याची खात्री करावी. ज्या सावकारांनी कर्जदाराचे गहाण माल परत केले आहे, त्याचे प्रस्ताव उपनिबंधकांकडे सादर करावे. कोणतीही अपात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेणार नाही याची काळजी घेऊन मोहीम राबवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले.११ तालुक्यातील शेतकरी४शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात तालुकानिहाय प्रकरणे अशी आहेत. नागपूर तालुका- २ सावकार, शेतकरी संख्या -३, कर्जमाफी रक्कम ४२ हजार १२ रुपये, उमरेड तालुका ११ सावकार, शेतकरी संख्या ६०, कर्जमाफी २९ लाख ८६ हजार ६६८ रुपये, काटोल तालुका १७ सावकार, शेतकरी संख्या ११०, कर्जमाफी १३ लाख ८९ हजार ३८८ रुपये, हिंगणा तालुका एक सावकार, शेतकरी संख्या ३, कर्जमाफी २१ हजार ३६६ रुपये, मौदा तालुका एक सावकार, शेतकरी संख्या १, कर्जमाफी ५ हजार ९४०, कळमेश्वर तालुका १२ सावकार, ९५ शेतकरी संख्या, कर्जमाफी १२ लाख ७९ हजार १७ रुपये, रामटेक तालुका ५ सावकार, शेतकरी संख्या ४६, कर्जमाफी ८ लाख ८५ हजार २६० रुपये, सावनेर तालुका ८ सावकार, ६० शेतकरी, १२ लाख ९४ हजार १२२ रुपये, नरखेड तालुका ४ सावकार, १५ शेतकरी संख्या, कर्जमाफी ३ लाख २८ हजार ४२३ रुपये, पारशिवनी तालुका ९ सावकार, शेतकरी संख्या ४२, कर्जमाफी ११ लाख १० हजार ६४६ रुपये, कुही तालुका ५ सावकार, शेतकरी संख्या ९, कर्जमाफी ८८ हजार १७२ रुपये अशा एकूण ७५ सावकारांकडून ४४४ शेतकऱ्यांनी घेतलेल्या ९४ लाख २१ हजार ८१४ रकमेला कर्जमाफी देण्यात आली आहे.