शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाला ४४ लाखांचा गंडा, महिला रोखपालाविरोधात गुन्हा दाखल

By योगेश पांडे | Updated: August 30, 2024 23:19 IST

सॉफ्टवेअरमध्ये ४३९ पावत्यांमध्ये केला बदल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एरवी काही ना काही कारणाने सातत्याने चर्चेत राहणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भ्रष्टाचाराचे मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका महिला रोखपालाने विद्यापीठाला ४४ लाखांहून अधिक रकमेचा गंडा घातला. विद्यापीठाच्या सॉफ्टवेअरमध्ये तिने ४३९ पावत्या अवैध पद्धतीने अपडेट करत अपहार केला. या प्रकरणात अंबाझरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बबिता नितीन मसराम (४०, एसआरपीएफ क्वॉर्टर्स, हिंगणा) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती विद्यापीठात कनिष्ठ लिपिक पदावर असून, कॅश काऊंटरवर रोखपाल म्हणून कार्य करते. विद्यापीठात कॅश काऊंटरवरील रोखपाल एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम करतात. त्यांना युझर आयडी व पासवर्डदेखील देण्यात आला आहे. जर एखादी नोंद चुकली, तर त्याच दिवशी त्यात बदल करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. जर चूक नंतर समोर आली, तर अधिकारी पावती मॉडिफाय करू शकतात. २०२३ मधील एका पावतीमुळे हा भ्रष्टाचार समोर आला. एम. के. बिल्डरने विद्यापीठाच्या अभियंता विभागाच्या मार्फत ३४,१६० रुपयांची पावती सुरक्षा ठेवीच्या रिफंडसाठी जमा केली. वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता, मूळ पावती केवळ ४,१६० रुपयांची होती. त्यात बबिता मसरामच्या लॉगिन आयडीवरून २०२२ मध्येच मॉडिफिकेशन झाले होते. याबाबत विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी हरीश पालीवाल यांनी मसरामला विचारणा केली असता तिने चुकीने मॉडिफिकेशन झाल्याचा दावा केला व ३० हजार रुपये विद्यापीठाच्या खात्यात भरले. मात्र, पालीवाल यांना संशय आला व त्यांनी तिच्या युझर आयडीवरून दिलेल्या पावत्यांची तपासणी केली. त्यात ४३९ तिने मॉडिफाय करत विद्यापीठाला तब्बल ४४ लाख ४० हजारांचा गंडा घातल्याची बाब समोर आली. विद्यापीठाने याची आणखी सखोल चौकशी केली. पालीवाल यांच्या तक्रारीवरून मसरामविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२०१९ पासून सुरू होता प्रकारबबिता मसरामकडून हा प्रकार २०१९ पासून सुरू होता. २०१९ ते २०२३ या कालावधीत मसरामने ४३९ पावत्या मॉडिफाय करत अपहार केला. मसरामसोबत इतर कुणी कर्मचारी किंवा अधिकारी यात सहभागी आहेत का याची चौकशी सुरू आहे. मसरामने इतक्या मोठ्या प्रमाणात पावत्या मॉडिफाय केल्यावरदेखील कुणालाही संशय कसा काय आला नाही की, यामागे नियोजनबद्ध पद्धतीने केलेला भ्रष्टाचार आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.