शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
2
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
3
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
4
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
5
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
6
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
7
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
10
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
12
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
13
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
14
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
15
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
16
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
17
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
18
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
19
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
20
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
Daily Top 2Weekly Top 5

४० हजार प्रवासी तक्रारी केवळ ७ !

By admin | Updated: June 6, 2015 02:12 IST

नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन

जनजागृतीचा अभाव : ‘हेल्पलाईन’ क्रमांकाला हवी प्रचार-प्रसाराची ‘हेल्प’दयानंद पाईकराव ल्ल नागपूर नागपूर रेल्वेस्थानकावरून दररोज ३५ ते ४० हजार प्रवासी ये-जा करतात. त्यांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. परंतु या क्रमांकाबाबत प्रवाशांमध्ये जनजागृतीच करण्यात येत नसल्यामुळे या सुविधेपासून हजारो रेल्वे प्रवासी वंचित राहत असल्याची वस्तुस्थिती आहे. या हेल्पलाईनवर केवळ सात तक्रारींची नोंद होत असल्यामुळे या क्रमांकाबाबत व्यापक प्रसिद्धी करण्याची गरज निर्माण झाली आहे.रेल्वेगाडीत प्रवास करताना प्रवाशांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. चालू गाडीत कोणाला मदत मागायची हा प्रश्न निर्माण होतो. रेल्वेगाड्यात असामाजिक तत्त्वांच्या हालचाली वाढीस लागल्या आहेत. प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींवर अंकुश लावण्यासाठी आणि त्यांना रेल्वे प्रवासात सुरक्षितता प्रदान करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने १८२ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. परंतु केवळ हा क्रमांक उपलब्ध करून रेल्वे प्रशासनाने आपली जबाबदारी झटकल्याचे चित्र आहे. प्रत्यक्षात या क्रमांकाबाबत प्रवाशांना माहिती देण्यासाठी कुठलीच उपाययोजना होताना दिसत नाही. रेल्वे प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या क्रमांकाबाबत रेल्वेस्थानकावर ध्वनिक्षेपकावरून सूचना देणे गरजेचे आहे. याशिवाय रेल्वेगाड्यात स्टीकर्स लावणे, आकाशवाणी, दूरदर्शनवर जाहिराती देणे या उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. परंतु यापैकी कुठलीच बाब होताना दिसत नाही.अशी आहे सुविधारेल्वेगाडीत प्रवासी प्रवास करताना त्यास सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अडचण आल्यास त्याने १८२ क्रमांक डायल करावयाचा आहे. हा क्रमांक रेल्वेच्या नियंत्रण कक्षात उचलल्या जाईल. एखादा प्रवासी नागपूर स्थानकावरून गाडीत बसला आणि त्यास अडचण असली तर पुढील स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचे जवान त्या प्रवाशाची समस्या जाणून घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.