शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची ३३ टक्के उपस्थिती()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

विद्यार्थ्यांत उत्साह : सुरक्षेची काळजी घेत चढले शाळेची पायरी लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मिशन बिगीन ...

विद्यार्थ्यांत उत्साह : सुरक्षेची काळजी घेत चढले शाळेची पायरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मिशन बिगीन अगेनअंतर्गत सोमवारी नागपूर महापालिका हद्दीतील शाळा, विद्यालये सुरू झाली. मनपाच्या २९ शाळांमध्ये इयत्ता ९वी ते १२ वी मध्ये ३८९६ विद्यार्थी असून यातील १२८५ विद्यार्थी पहिल्या दिवशी उपस्थित होते. जवळपास ३३ टक्के उपस्थिती होती. विद्यार्थी तब्बल दहा महिन्यांनंतर प्रथमच शाळेची पायरी चढले. विद्यार्थी सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालनही करताना दिसून आले.

...

सभापतींनी साधला संवाद

मनपाच्या विवेकानंदनगर हिंदी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, उपसभापती प्रमोद तभाने व शिक्षणाधिकारी प्रीति मिश्रीकोटकर यांनी भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले. एकमेकांशी हस्तांदोलन टाळणे, पाणी पिण्यासाठी स्वत:च्याच बॉटलचा उपयोग करणे, पूर्णवेळ मास्क लावूनच राहणे अशा अनेक सूचना त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केल्या. या शाळेत ५०टक्के विद्यार्थी उपस्थित होते.

....

स्क्रीनिंग तपासणीनंतरच वर्गात प्रवेश

कोविडपासून बचाव व्हावा, यासाठी सर्व शााळांमध्ये मनपाने विशेष तयारी केली आहे. प्रत्येक विद्यार्थी फिजिकल डिस्टन्सिंग राखून शाळेमध्ये येतो आहे. निर्जंतुकीकरण, त्याची थर्मल स्क्रीनिंग, ऑक्सिजन तपासणी केली जाते. सॅनिटाईज करून वर्गामध्ये प्रवेश दिला जात आहे. एका टेबलवर एक याप्रमाणे विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली असून सर्व विद्यार्थ्यांना मास्क वापरण्यासही सांगण्यात येत आहे.

...

पहिल्याच दिवशी पुस्तक वाटप

. शाळेच्या पहिल्याच दिवशी मनपातर्फे सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्यात आली. विद्यार्थ्यांचे गणवेशही लवकरच वितरित केले जातील. लवकरच १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत. पुढे १५ जानेवारीपर्यंत शिक्षणविषयक विविध उपक्रमही मनपाद्वारे सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती दिलीप दिवे यांनी दिली.