शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
4
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
5
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
6
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
7
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
8
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
9
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
10
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
11
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
12
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
13
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
14
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
15
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
16
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
17
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
18
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
19
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
20
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 07:00 IST

यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले.

ठळक मुद्दे४ फूट उंच मूर्तीचे बंधन, किमतीत घट, व्यवसायात घसरण

मोरेश्वर मानापुरेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी गणेश मंडळाला ४ फूट उंच मूर्तीची स्थापना करण्याचे नियम प्रशासनाने घालून दिल्याचा फटका मूर्तिकारांना बसला असून उलाढाल कमी झाली आहे. विविध सणांमध्ये नागपूर जिल्ह्यात सहा महिन्यात अर्थात मेपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत जवळपास ५०० मूर्तिकारांचा एकत्रित व्यवसाय ५० कोटींचा असतो. पण यावर्षी जवळपास २० कोटींचीच उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे मूर्तिकारांना ३० कोटींचा फटका बसणार असल्याची शक्यता नामवंत मूर्तिकारांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. यातील सर्वाधिक फटका गणेशोत्सवात बसणार असल्याचे मूर्तिकार म्हणाले.हिंदू धर्मात मूर्तीपूजेला महत्त्व आहे. सणांमध्ये मूर्ती घरी बसवून मनोभावे पूजा करण्याची हजारो वर्षांची परंपरा आहे. गेल्यावर्षीपर्यंत मूर्तीची उंची किती असावी, याचे बंधन नव्हते. पण यावर्षी कोरोनामुळे धार्मिक उत्सव थोडक्यात आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून साजरे करण्याचे बंधन आले आहे. एकूण उलाढालीपैकी ७० टक्के व्यवसाय गणेशोत्सवात होतो. याकरिता मूर्तिकार मेच्या पहिल्या आठवड्यापासून तयारी करतात. पण यावर्षी मनपाचे दिशानिर्देश पूर्वी न आल्याने सर्व गणेश मंडळांनी मूर्तींचे ऑर्डर दिले नाहीत. त्यामुळे यावर्षी जूनच्या अखेरीस मूर्ती तयार करण्यास सुरुवात झाली. नागपुरात जवळपास १५० ते २०० मोठे मंडळ ८ ते १० फूट उंच मूर्ती बसवितात. पण यावर्षी उंचीच्या बंधनाने अनेकांनी यावर्षी उत्सव साजरा न करण्याचे ठरविले आहेत. याशिवाय सार्वजनिक, सोसायट्यांमध्ये आणि घरी साजरा करणाऱ्या उत्सवातही गणेश मूर्तीची उंची कमी झाली आहे. यासोबत मूर्तिकारांना होणाºया मिळकतीवर ७० टक्के विपरीत परिणाम झाल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

रामनवमी, झुलेलाल शोभायात्रा आणि विविध समाजाच्या निघणाºया शोभायात्रांसाठी सजावटीची कामे मूर्तिकारांतर्फे करण्यात येतात. यंदा शोभायात्रा निघाल्याच नाहीच. तसेच गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, शारदोत्सवात अर्ध्या फूटापासून १० ते १२ फूट उंच मूर्ती होतात. उंचीनुसार किंमत असते. या व्यवसायावर जवळपास कारागीर आणि हेल्पर असे एकूण ५ हजार जण अवलंबून आहेत. पण यंदा व्यवसायच नसल्याने मूर्तिकारांच्या अनेक मदतनिसांनी अन्य व्यवसाय निवडला आहे. गणेश विसर्जनातच कोरोनाचे विसर्जन होऊन मूर्तिकारांच्या व्यवसायाला पुन्हा सुगीचे दिवस यावेत, अशी अपेक्षा मूर्तिकारांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव