शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

११८७ जागांसाठी २७८९ उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:19 IST

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. ...

नागपूर : नागपूर जिल्ह्यात १३० ग्रामपंचायतींपैकी कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (आदासा) आणि सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली आहे. आता जिल्ह्यातील १२८ ग्रा.पं.च्या ११८७ जागांसाठी २७८९ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १५ जानेवारीला निवडणूक होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होईल.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध ग्रा.पं.साठी इच्छुक असलेल्या ३३२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता २७८९ उमेदवार रिंगणात आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांच्या छाननीअंती ३१२१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. निवडणूक होऊ घातलेल्या ग्रा.पं.साठी २,९१,०८७ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात १,५१,७९८ पुरुष तर १,३९,२९६ महिला उमेदवारांचा समावेश आहे.

कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर (अदासा) ग्रा.पं.च्या ७ जागांसाठी सातच अर्ज आल्याने ही ग्रा.पं.आधीच अविरोध झाली होती. दरम्यान, सोमवारी सावनेर तालुक्यातील जटामखोरा ग्रा.पं.ची निवडणूक अविरोध झाली. येथे ७ जागांसाठी ९ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. यातील दोघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथील निवडणूकही अविरोध झाली आहे. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांत सोमवारी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वाटपाची प्रक्रिया झाली. त्यामुळे आता गावागावांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. मंगळवार (दि. ५) पासून गावागावांत राजकीय फड रंगणार आहेत. १३ जानेवारी रोजी प्रचारतोफा थंडावतील.

नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असाच सामना रंगणार आहे. मात्र, काही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थकांनी वेगवेगळी चूल मांडली आहे. त्यामुळे येथील राजकीय पारा चढला आहे. यात कामठी, कुही आणि नागपूर (ग्रामीण) मधील काही ग्रा.पं.चा समावेश आहे. त्यामुळे काही गावांत दुरंगी, तर काही गावांत चौरंगी लढत होईल.

दवलामेटी, सातगाव वेणानगर येथे सर्वाधिक उमेदवार

नागपूर ग्रामीण तालुक्यातील दवलामेटी ग्रा.पं.च्या १७ जागांसाठी ७८ उमेदवार रिंगणात आहेत. यासोबतच हिंगणा तालुक्यातील सातगाव वेणानगर येथील १५ जागांसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. तसेच कामठी तालुक्यातील कोराडी येथे १७ जागांसाठी ४३ उमदेवार आपले नशीब आजमावणार आहेत.

कोराडी, पाटणसावंगीकडे जिल्ह्याचे लक्ष

नागपूर जिल्ह्यात निवडणूक होऊ घातलेल्या १२८ ही ग्रा.पं.मध्ये रंगतदार लढती होणार आहेत. मात्र, कामठी तालुक्यातील कोराडी आणि सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी ग्रा.पं.च्या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. कोराडी हे भाजपचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तर पाटणसावंगी हे राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे होमटाऊन आहे. कोराडीत कॉँग्रेस समर्थित पॅनल आणि भाजप समर्थित पॅनल अशी दुहेरी लढत होईल. मात्र, येथे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्याने याचा फटका कोणाला बसतो, याकडे लक्ष लागले आहे. येथे काही वाॅर्डात अपक्षांनीही दंड थोपटले आहेत. कोराडीत काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुरेश भोयर आणि जि.प.सदस्य नाना कंभाले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पाटणसावंगी ग्रा.पं.मध्ये काँग्रेस समर्थित पॅनल आणि भाजप समर्थित पॅनेलमध्ये थेट लढत होणार आहे. या १७ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये वॉर्ड क्रमांक ६ मध्ये निवडणूक अविरोध झाली आहे. त्यामुळे येथे उर्वरित ५ वॉर्डातील १४ जागांसाठी निवडणूक होईल. येथे काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राय यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.