शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
4
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
5
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
6
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
7
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
8
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
9
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
10
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
11
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
12
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
13
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
14
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
15
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
16
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
17
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
18
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
19
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
20
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

यशवंत स्टेडियमसमोर उभे राहणार २५ मजली पार्किंग, व्यावसायिक संकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST

नागपूर : अनलॉकनंतर परिस्थिती सामान्य होत असून महामेट्रोने कामाची गती वाढविली आहे. धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमसमोर २५ मजली पार्किंग ...

नागपूर : अनलॉकनंतर परिस्थिती सामान्य होत असून महामेट्रोने कामाची गती वाढविली आहे. धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमसमोर २५ मजली पार्किंग आणि व्यावसायिक संकुल उभे राहणार आहे. याकरिता महामेट्रोने निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

व्यावसायिक संकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर नागपूरचा चेहरामोहरा बदललेला दिसणार आहे. प्रस्तावित महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची उंची ८८ मीटर असून इमारत २५ मजली राहील. पीपीपी तत्त्वावर प्रकल्प राबविणार आहे. पुलाच्या (फूट ओव्हर ब्रिज) माध्यमातून हे संकुल सीताबर्डी स्टेशनशी जोडले जाईल. संबंधित कंत्राटदारांना काम पूर्ण करण्याकरिता ४ वर्षांचा अवधी मिळेल. बांधकामाच्या अवधीसह एकूण ६० वर्षांच्या काळाकरिता संकुल भाडेपट्टा तत्त्वावर दिले जाणार आहे. बांधकामाच्या नियमाप्रमाणे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला चारचाकी, दुचाकी आणि सायकलकरिता पार्किंगची सोय करावी लागेल. याशिवाय संबंधिताला १०० कार आणि १०० दुचाकी वाहनांकरिता पार्किंग सुविधादेखील करावी लागणार आहे.