शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

२०२० पर्यंत नागपूर ‘ग्लोबल’ होणारच

By admin | Updated: November 23, 2015 02:30 IST

आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख बनविण्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’सोबतच ‘ग्लोबल’ ....

आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचा विश्वास : ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ची सांगतानागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ची वेगळी ओळख बनविण्यासाठी नागपूर सज्ज झाले आहे. ‘स्मार्ट सिटी’सोबतच ‘ग्लोबल’ शहराकडे शहराची वाटचाल सुरू असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नकारात्मक बाबी दूर सारून सकारात्मक नियोजन करायला हवे, असे मत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योजक व तज्ज्ञांनी व्यक्त केले. ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’ची रविवारी सांगता झाली. यावेळी विविध देशांतील सदस्यांनी नागपूरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या व शहराच्या क्षमतेबाबत विश्वास व्यक्त केला.‘नागपूर फर्स्ट’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलेल्या ‘ग्लोबल नागपूर समिट’ला शनिवारी आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टम्स येथे सुरुवात झाली होती. दोन दिवसांत विविध मुद्यांवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी आपली मते मांडली व नागपूरला मौलिक सल्ले दिले. युनायटेड किंगडम, कॅनडा, अमेरिका येथील तज्ज्ञांसह ब्रिटिश उपउच्चायुक्त कुमार अय्यर, स्विडनच्या मुंबई येथील महावाणिज्यदूत फ्रेडेरिका ओमब्राईंट, आॅस्ट्रेलियाचे महावाणिज्यदूत मार्क पिअर्स यांची उपस्थिती होती. सांगता समारंभाच्या वेळी ‘नागपूर फर्स्ट’चे अध्यक्ष दिनेश जैन यांनी आपले मत मांडले. नागपूरला २०२० पर्यंत ‘ग्लोबल’ शहर करणे हे ‘नागपूर फर्स्ट’चे उद्दिष्ट आहे. हे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शपथ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. नागपूरच्या क्षमतांचे आम्ही पूर्ण प्रयत्न लावून ‘मार्केटिंग’ करू. शहराच्या काही कमकुवत आणि बलशाली बाजू आहेत. परंतु कमकुवत बाबी दूर सारुन बलस्थानांवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे, असेदेखील ते म्हणाले. वर्धा ‘आयटी पार्क’ची स्थापना करणाऱ्या झुबेर यांची प्रशंसा करत जैन म्हणाले की, नागपूरमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात उद्योग यावेत यासाठी ‘नागपूर फर्स्ट’ सर्वांना जोडण्याचे प्रयत्न करत आहे. पुढील वर्षी आयोजित होणाऱ्या वार्षिक ‘ग्लोबल नागपूर समिट’ची संकल्पना नागपूर व विदर्भातील विविध उद्योगांत होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवर असेल, अशी घोषणा जैन यांनी यावेळी केली. या दोन दिवसीय ‘ग्लोबल समिट’ला यशस्वी करण्यासाठी सहभागी असलेल्यांचे त्यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)