शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

१५ जलसंपदा उपअभियंत्यांची पुन्हा मुदतवाढीसाठी मोर्चेबांधणी

By admin | Updated: July 20, 2014 01:10 IST

जलसंपदेचा ‘अर्थ’ कळणारे अधिकारी जागेवरून हलायला तयार नाहीत. अशाच ‘अर्थ’कारणातून राज्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडले आहे.

राजकीय वरदहस्तातून पाठराखण : एकाच मंडळात दहा वर्षांपेक्षा अधिक काळ सतीश येटरे - यवतमाळजलसंपदेचा ‘अर्थ’ कळणारे अधिकारी जागेवरून हलायला तयार नाहीत. अशाच ‘अर्थ’कारणातून राज्यात जलसंपदा विभागाच्या उपविभागीय अभियंत्यांनी १० वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडले आहे. राजकीय वरदहस्तातून मुक्कामी अधिकाऱ्यांची पाठराखण केली जात आहे. यवतमाळ पाटबंधारे विभागही त्याला अपवाद नाही. राज्याच्या जलसंपदा विभागाने २०१३ मध्ये स्थापत्य संवर्गातील ३१ उपविभागीय अभियंत्यांच्या बदल्या केल्या. शासनाच्या नागरी सेवा नियमाच्या बदली धोरणानुसार एका ठिकाणी तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कोणताही अधिकारी कार्यरत राहू शकत नाही. मात्र हा नियम मोडीत काढून बदली आदेश प्राप्त होऊनही १५ अभियंत्यांनी मुदतवाढ मिळविली. त्यासाठी राजकीय वरदहस्त, कंत्राटदारांची वशिलेबाजी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मैत्रीपूर्ण संंबंध कारणीभूत ठरले. गतवर्षी निर्धारित कालावधीसाठी बदलीला स्थगनादेश मिळविला. तसेच त्याचठिकाणी कार्यरत राहण्यासाठी एक ते चार महिन्यांपर्यंत मुदतवाढ मिळविली. या मुदतवाढीच्या जोरावर त्यांनी वर्षभराचा कालावधी त्याच ठिकाणी काढला. आता मुदत संपल्यानंतर कुणीही गॉडफादर नसलेल्या अभियंत्यांनी त्यांना बदलीच्या ठिकाणी सोडावे, यासाठी कंबर कसली आहे. मुदतवाढ घेणाऱ्या अभियंत्यांमध्ये उपविभागीय अभियंता अनिल सोनेवार, नियंत पाठक, चंदूसिंग राठोड, देवीदास राठोड, काशिनाथ शिवपूजे, नंदकुमार महाडीक, राजेंद्र पवार, चंद्रकांत मगदूम, साहेबराव जाधव, रमेश खलाटे, नंदकुमार शेटे, प्रमोद सोनार, रोहिदास सोमवंशी, ज्ञानेश्वर अच्युत, दिलीप गंजेवार आदींचा समावेश आहे. यातील बहुतांश अभियंते आजही मुदतवाढ मिळवून त्याच ठिकाणी कार्यरत आहेत. या प्रकाराने पुन्हा एकदा जलसंपदा विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. एवढेच नव्हे तर स्वच्छ प्रतिमा असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या नावाचाही वापर या गंभीर प्रकारात होत असल्याचे पुढे आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवाचा हस्तक्षेपयवतमाळ पाटबंधारे मंडळात गेल्या दहा वर्षांपासून उपविभागीय अभियंता अनिल सोनेवार कार्यरत आहे. ३१ मे २०१३ ला त्यांची चंद्रपूर येथे बदली झाली. मात्र मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता अ.प. सुरोशे यांना हाताशी धरून त्यांनी चार महिन्यांची मुदत मिळविली. त्यानंतर स्थानिक आमदाराच्या मदतीने पुन्हा मुदतवाढ मिळविली. यावर्षी तर थेट मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्यक अभिजित खोरपडे यांचे वजन वापरले. त्यांनी त्यासाठी जलसंपदा विभागाचे अमरावती येथील सहायक मुख्य अभियंता सं. दि. पांडे यांना दूरध्वनी केला. तसेच सोनेवार यांना मुदतवाढ देण्यात यावी, असे फर्मान सोडले. सोनेवार यांना मुदतवाढ देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या खासगी स्वीय्य सहायकाच्या दूरध्वनीचा संदर्भ देत काढण्यात आलेल्या आदेशात तसा हवालाही देण्यात आला आहे.