शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दोन दिवसात १२४५ रुग्ण, ३९ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 07:00 IST

गेल्या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात १२४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे जीव गेले. यात शनिवारी ७३३ रुग्ण व १४ मृत्यू तर रविवारी ५१२ रुग्ण व २५ मृत्यू होते.

ठळक मुद्दे५१२ पॉझिटिव्ह, २५ बळी मृतांमध्ये १४ वर्षीय मुलगा, २१ वर्षीय युवक, ३० वर्षीय बाळंतीण व १०० वर्षीय रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गेल्या दोन दिवसात नागपूर जिल्ह्यात १२४५ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ३९ रुग्णांचे जीव गेले. यात शनिवारी ७३३ रुग्ण व १४ मृत्यू तर रविवारी ५१२ रुग्ण व २५ मृत्यू होते. रुग्णांची एकूण संख्या १३९९० झाली असून मृतांची संख्या ४८८ वर पोहचली आहे. यात ग्रामीण भागातील ३८१८, शहरातील १०१७२ तर जिल्ह्याबाहेरील २४३ रुग्ण आहेत. या दोन दिवसातील मृतांमध्ये १४ वर्षीय मुलगा २१ वर्षीय तरुण, ३० वर्षीय बाळंतीण व १०० वर्षीय पुरुष रुग्ण आहे. नागपूर जिल्ह्यात सोमवारनंतर पहिल्यांदाच रुग्णसंख्या ५०० वर आली. विशेष म्हणजे, मागील आठवड्यात हजारावर रुग्ण संख्या गेली असताना आज रुग्ण अर्ध्यावर आल्याने आरोग्य यंत्रणेला काहिसा दिलासा मिळाला. मात्र शनिवारच्या तुलनेत रविवारी मृत्यूचे प्रमाण वाढल्याने चिंतेचे वातावरण कायम आहे.

मेयोमध्ये शनिवारी चार रुग्णांचे मृत्यू झाले. यात महेंद्रनगर येथील ३० वर्षीय बाळंतणीचा समावेश आहे. या मातेचा प्रसुतीनंतर चार दिवसानी मृत्यू झाला. महिलेला निमोनीआसह इतरही आजार होते. आराधना कॉलनी नारा रोड येथील १०० वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मेयोमध्ये मृत्यू झाला. आतापर्यंतच्या मृतांमध्ये सर्वाधिक वयाचा हा रुग्ण होता. मेडिकलमध्ये आज १२ मृत्यूची नोंद झाली.अ‍ॅन्टिजन चाचणीत २४७ पॉझिटिव्हरॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणीत आज २४७ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. आरटीपीसीआर चाचणीत मेडिकलमधून ८२, मेयोच्या प्रयोगशाळेतून १००, एम्सच्या प्रयोगशाळेतून दोन, खासगी लॅबमधून ७९ असे एकूण ५१२ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात ग्रामीणमधील १३९ तर शहरातील ३७३ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये तीन ग्रामीणमधील, २० शहरातील तर दोन जिल्ह्याबाहेरील आहेत. आज २३९ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत ६५३९ रुग्ण बरे झाले आहेत. २५५५ रुग्ण उपचार घेत आहेत.मेडिकलच्या खाटा होत आहे फुल्लमेडिकलच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या खाटा फुल्ल होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. ६०० खाटांच्या या हॉस्पिटलमध्ये रविवारी ४५१ खाटांवर रुग्ण होते तर मेयोच्या ६०० खाटांच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ३१९ रुग्ण उपचार घेत होते. जिल्ह्यात या दोनच हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर रुग्णांवर उपचार होत आहेत. येथील खाटा फुल्ल झाल्यास, गरीब व सामान्यांवर कुठे उपचार होतील, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस