शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

खर्चाच्या निकषामुळे ११ कोटी अखर्चित

By admin | Updated: November 20, 2014 01:06 IST

अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत असाव्या या हेतूने सरकारकडून निधी दिला जातो. परंतु सरकारच्याच खर्चाच्या निकषानुसार मंजूर निधीतून बांधकाम शक्य नाही. त्यामुळे मागील दोन वर्षात जिल्हा

जिल्हा परिषद : २६१ अंगणवाड्यांचे बांधकाम रखडलेगणेश हूड - नागपूर अंगणवाड्या स्वत:च्या इमारतीत असाव्या या हेतूने सरकारकडून निधी दिला जातो. परंतु सरकारच्याच खर्चाच्या निकषानुसार मंजूर निधीतून बांधकाम शक्य नाही. त्यामुळे मागील दोन वर्षात जिल्हा परिषदेचा ११.७५ कोटींचा निधी अखर्चित आहे. अंगणवाड्यांचे बांधकाम रखडल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत जिल्ह्यातील २६१ अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी जि.प.ला २०१२ ते मार्च २०१४ या दोन वर्षात विविध योजनांतर्गत शासनाकडून ११.७५ कोटींचा निधी प्राप्त झाला . परंतु महिला व बालकल्याण विभागाच्या मंजूर आराखड्यानुसार अंगणवाडी बांधकामासाठी ४.५० लाखाचा खर्च पुरेसा आहे. प्रत्यक्षात या रकमेत बांधकाम शक्य नसल्याने कंत्राटदारांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. दुसरीकडे सरकारच्याच मानव संसाधन विकास विभागाकडून अंगणवाडी बांधकामासाठी बिगर आदिवासी भागात ६ लाख तर आदिवासी भागात ६.५० लाखांचा निधी मिळतो. काम एकच पण खर्च मर्यादा मात्र वेगवेगळी, असा हा अफलातून प्रकार आहे. जिल्ह्यात २१६१ अंगणवाड्या तर २७८ मिनी अंगणवाड्या आहेत. यातील ८०० अंगणवाड्या ग्रामपंचायत कार्यालय, समाजभवन, शाळा वा भाड्याच्या जागेत भरतात. अशा अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती असाव्या, या हेतूने सरक ार निधी उपलब्ध करते. परंतु यात बांधकामावर अपेक्षित खर्च गृहित न धरता ४.५० लाखांच्याच खर्चाची मर्यादा दिली आहे. या रकमेत नवीन इमारतीचे बांधकाम शक्य नसल्याने २६१ अंगणवाड्यांचे बांधकाम रखडले आहे.अनुदान वाढीची मागणी बांधकाम साहित्याच्या वाढलेल्या किमती व वाढलेले मजुरी दर विचारात घेता ४.५० लाखात अंगणवाडी व कार्यालयाचे बांधकाम शक्य नाही. त्यामुळे बिगर आदिवासी भागात ६ लाख तर आदिवासी भागात ६.६० लाखांचे अनुदान बांधकामासाठी दिले जाते. या धर्तीवर जि.प.ला अंगणवाडी बांधकामासाठी निधी द्यावा अशी मागणी जि.प.अध्यक्ष निशा सावरकर यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.