शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटो महाग का झाला? भाव वाढला पण शेतकऱ्यांना होईना फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2023 09:54 IST

टोमॅटोचे उत्पादन कमी झाल्यामुळे काही दिवसांपासून किरकोळ बाजारात ताे 150 ते 200 रुपये किलो झाला आहे. वाढलेल्या भावाचा शेतकऱ्यांना मात्र फार विशेष फायदा होताना दिसत नाही. शेतकऱ्यांच्या टोमॅटोला किलोमागे सरासरी 80 रुपये इतकाच भाव मिळत आहे. 

योगेश बिडवई, मुख्य उपसंपादक 

यंदा पहिल्या हंगामात शेतकऱ्यांना टोमॅटोला किलोमागे केवळ ७ ते १० रुपये भाव मिळाला. दुसऱ्या हंगामात तर नीचांकी ५ रुपयांपर्यंत भाव होता. त्यामुळे टोमॅटो उत्पादकांसाठी तो आतबट्ट्याचाच खेळ झाला. अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकला. काहींनी शेतात गुरे सोडून दिले, त्याची छायाचित्रेही वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली. मात्र शहरातील लोकांचे त्याकडे फारसे लक्ष गेले नाही. तोट्यात विकण्यापेक्षा नंतर अनेक शेतकऱ्यांनी प्लॉट तसेच सोडून दिले. मग काय, उत्पादन घसरले. त्यातच उशिराचा पाऊस, बदलते हवामान, वाढलेले तापमान याचाही देशभरातील उत्पादनाला फटका बसला आणि आता आठ-पंधरा दिवसांपासून भाव वाढले आहेत. मात्र शेतकऱ्यांकडून ८० रुपये किलोने घेतलेला टोमॅटो आपल्या घरापर्यंत येईपर्यंत मध्यस्थांच्या साखळीमुळे १५० ते २०० रुपये किलो होतात. मध्यस्थांची नफेखोरी महागाईला आमंत्रण देते. 

उत्पादन खर्च किती? एक किलो टोमॅटोचा उत्पादन खर्च सरासरी १३ रुपयांपर्यंत येतो. बाजार समितीत नेईपर्यंत हा खर्च १६ ते १७ रुपयांवर जातो. एकरी साधारण एक लाखापेक्षा जास्त खर्च येतो. उत्पादन कमी झाले तर खर्च वाढतो. 

शेतकऱ्यांना मोठा फटका शेतकऱ्यांनी यावर्षी मार्च महिन्यात सरासरी भाव ५-१० रुपये, एप्रिलमध्ये ५-१५ रुपये आणि मे महिन्यात तर केवळ २.५० ते ५ रुपये किलो दराने टोमॅटो विकले. त्यामुळे शेतकऱ्यांना किती फटका बसला असेल, याची कल्पना येते.  

मी दोन एकरावर टोमॅटो लागवड केली होती. मात्र मे व जूनच्या सुरुवातीला मला किलोमागे केवळ २ ते ४ रुपये भाव मिळाला. बाजारात नेण्याचा खर्चही वसूल होईना. त्यामुळे तो प्लॉट मी तसाच सोडून दिला. टोमॅटोचा शेतातच चिखल झाला. माझा दोन लाखांचा खर्च वाया गेला.  - अमृत कापडणीस, टोमॅटो उत्पादक, सटाणा, नाशिक

कसे आहे गणित? राज्यात सातारा, जुन्नर आणि नाशिकमध्ये टोमॅटोचे चांगले उत्पादन होते. औरंगाबाद पट्ट्यातही आता टोमॅटो पीक घेतले जाते.  सातारा, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात एप्रिल ते ऑगस्टपर्यंत बाजारात टोमॅटो येतो. त्यानंतर नाशिकपासून इतर ठिकाणी आवक वाढते. राज्यनिहाय टोमॅटोच्या उत्पादनाचा कालावधी भिन्न आहे. टोमॅटो काढणीचा काळ डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर या काळात टोमॅटोचे उत्पादन कमी असते.  

 

 

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी