शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन बार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:05 IST

मोठी शहरं, महानगरांत किती प्रदूषण असतं ! यावर काहीतरी करायला पाहिजे, असा विचार मुलांच्या डोक्यात कधीचा चालू होता. शिवाय त्यातून पैसेही मिळाले पाहिजेत, यावरही त्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. शेवटी सुचली त्यांना युक्ती.

ठळक मुद्देधड ना लहान, धड ना मोठे अशा ‘मधल्या’ मुलांसाठी नवी ‘विण्डो’

- गौरी पटवर्धन

‘माझ्याकडे एकदम भारी बिझनेस प्लॅन आहे.’ सहावीतली सलोनी शेजारी राहणार्‍या चौथीतल्या अमोघला सांगत होती. शेजारच्याच खोलीत सलोनीची आजी दुपारची डोळे मिटून पडली होती. तिला झोप लागलेली नव्हती. त्यामुळे त्या दोघांचं सगळं बोलणं तिला ऐकू येत होतं. पण सलोनी आणि अमोघला ते माहितीच नव्हतं. 
‘बिझनेस प्लॅन म्हणजे? फॅक्टरी वगैरे काढायची का?’ बिचार्‍या अमोघने त्याला माहिती असलेला एकमेव बिझनेस सांगितला.
‘अरे’. सलोनीने त्याच्याकडे असं बघितलं की ‘किती लहान आणि बावळट आहे हा’. मग समजावून सांगण्याच्या आवाजात ती म्हणाली, ‘बिझनेस म्हणजे काही नुसती फॅक्टरी नसते, इतर पण खूप काय काय बिझनेस असतात. मला माहितीये. आमच्या स्कूलमध्ये शिकवतात ना.’ 
‘मीपण तुझ्याच स्कूलमध्ये आहे.’ अमोघ जरा दुखावल्या आवाजात म्हणाला.
‘अरे पण तू फोर्थमध्ये आहेस ना. तुम्हाला नाही एवढय़ात शिकवणार. जरा मोठं झालं, सिक्स्थमध्ये गेलं की शिकवतात.’
‘पण काय शिकवतात?’
‘अँक्च्युअली ना, आम्हाला न्यूजपेपर वाचायला सांगतात. तो मी वाचला. त्यातून मला एक भारी आयडिया सुचली आहे. न्यूजपेपरमध्ये छापलं होतं, की दिल्लीमध्ये ऑक्सिजन बार सुरू  झालाय. आणि त्याचे रेट्स काय आहेत माहितीये का? फिफ्टीन मिनिट्ससाठी थ्री हंड्रेड रुपीज. म्हणजे मोठय़ा पिझा हाउसमधल्या पिझापेक्षा पण महाग.’
‘पण ऑक्सिजन बार म्हणजे काय?’ अमोघच्या डोळ्यासमोर बहुदा चोकोबार असावा.
‘अरे, म्हणजे ते एक शॉप असतं’ सलोनी तिला समजलेली माहिती देत होती, ‘तिथे आपण जायचं, थ्री हंड्रेड रुपीज भरायचे. मग ते लोक आपल्याला फिफ्टीन मिनिट्ससाठी प्युअर ऑक्सिजन देणार.’
‘पण तिथे कशाला जायचं? आम्हाला तर शिकवलंय की जगात सगळीकडे ऑक्सिजन असतोच.’
‘अरे हो, पण दिल्लीसारख्या शहरांमध्ये खूप पोल्युशन असतं ना, तिथे लोकांना फ्रेश एअर मिळत नाही. त्यांना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही; पण माणसांना ऑक्सिजन लागतोच. म्हणून लोक अशा ऑक्सिजन बारमध्ये जाणार आणि तिथे जाऊन फ्रेश ऑक्सिजन घेणार.’
‘अच्छा’. आत्ता अमोघला थोडं थोडं लक्षात येत होतं. ‘पण तो ऑक्सिजन बार असतो कसा?’ ‘हे बघ’ सलोनीने पेपरमध्ये छापून आलेला फोटो दाखवला.
‘हे तर भारी रेस्टॉरंटसारखं आहे.’
‘हो.’
आता ऑक्सिजन बार काय आणि कसा असतो ते दिसल्यावर अमोघचा त्याच्यातला इंटरेस्ट संपला. मग तो सलोनीच्या मूळ विषयाकडे वळला. 
‘पण तुझा बिझनेस प्लॅन काय आहे?’ त्याने हे विचारल्यावर आतल्या खोलीतून ऐकणार्‍या आजीला फार बरं वाटलं. तिला केव्हापासून तो प्लॅन ऐकायचा होता. पण आपण विचारलं तर कदाचित सलोनी सांगणार नाही म्हणून ती विचारू शकत नव्हती. 
‘अरे तोच प्लॅन आहे.’ सलोनी म्हणाली. 
‘तोच म्हणजे?’ 
‘म्हणजे आपण पण ऑक्सिजन बार सुरू करायचा.’
‘आपण??? पण आपल्या इथे कुठे एवढं पोल्युशन आहे?’
‘आत्ता नाहीये. पण आपण मोठे होईपर्यंत होणारच ना? बाबा म्हणतात की या रेटने पोल्युशन वाढत राहिलं तर आपल्याला स्कूल बॅगबरोबर ऑक्सिजन सिलिंडरपण न्यायला लागेल.’
‘पण आपण कसा सुरू करणार असा बार?’ अमोघ परत पेपर उचलून त्यातला फोटो बारकाईने बघत म्हणाला, ‘आपल्याकडे दुकान पण नाहीये आणि पैसे पण नाहीयेत.’
‘पण माझी आयडिया अशी आहे की आपल्याला दुकान आणि पैसे लागणारच नाहीत!’ सलोनी एक्साइट होऊन म्हणाली. ‘आपण असा बार करणारच नाही. कारण असा बार करणारे लोक ऑक्सिजन कुठून आणतात?’
‘कुठून?’ अमोघने असा विचारच केला नव्हता.
‘‘अरे ते ऑक्सिजन देणार्‍या कंपनीतून विकत आणतात. मी आमच्या टीचर्सना विचारलं. त्या म्हणाल्या की काही फॅक्टरीमध्ये ऑक्सिजन तयार करतात आणि सिलिंडरमध्ये भरून तो विकतात.’
‘मग तो आणायला आपल्याला पैसे लागतील ना?’
‘नाही ना!’ आता सलोनी तिच्या बिझनेस प्लॅनच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आली होती, ‘आपण ऑक्सिजन विकत आणायचा नाही. आपण तो तयार करायचा.’
‘फॅक्टरी सुरू करून??’ अमोघ पुन्हा फॅक्टरीचाच विचार करत होता.
‘नाही रे, आपण ना भरपूर झाडं लावायची. झाडं ऑक्सिजन तयार करतात. आपण आत्ता झाडं लावायची, म्हणजे आपण कॉलेजला जाऊ तोवर ती मोठी होतील. मग आपण झाडाखाली बसण्याचे पैसे घ्यायचे. म्हणजे झाला आपला ऑक्सिजन बार!’
‘भारी आयडिया आहे. त्यात आपण आंब्याचं झाड लावू. म्हणजे आपल्याला आंबेपण मिळतील.’
‘आणि पेरूचं’
‘आणि जांभळाचं’
तिथे कुठली कुठली झाडं लावायची याचं प्लॅनिंग करत दोघं तिथून निघाले. त्यांच्या घराच्या मागे किती जागा आहे आणि त्यात किती झाडं लावता येतील हेही बघायला पाहिजे होतं. ते बाहेर गेल्यावर आजी मनात म्हणाली, ‘बिझनेस म्हणून का असेना, लेकरांना झाडं लावायची बुद्धी होते यातच सगळं पावलं. नाहीतर मोठी माणसं, आहे ती झाडं तोडून ऑक्सिजन बारमध्ये जाण्याचाच विचार करतील. ही मुलं आज झाडं लावतील आणि उद्या ऑक्सिजन बारची गरज नाहीशी होईल एवढीच आशा.’ 

lpf.internal@gmail.com
(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)