शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

ड्रॅगनचा तैवानवर फुत्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 06:00 IST

दोन महायुद्धांनी अवघ्या जगाचे मोठे नुकसान केले आहे आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. निमित्त आहे चीन आणि तैवान यांच्यात निर्माण झालेला प्रचंड तणाव.

ठळक मुद्देचीनला एकटे पाडण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी अमेरिका करू शकते. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानही तैवानच्या बाजूने उभे राहू शकतात.

- पवन देशपांडे

दोन महायुद्धांनी अवघ्या जगाचे मोठे नुकसान केले आहे आणि आता तिसऱ्या महायुद्धाच्या धमक्या दिल्या जात आहेत. निमित्त आहे चीन आणि तैवान यांच्यात निर्माण झालेला प्रचंड तणाव. चीनच्या एकूण क्षेत्राफळाच्या तुलनेत एक टक्काही क्षेत्रफळ नसलेल्या छोट्याशा तैवानने चीनच्या मुजोरीला बधणार नसल्याचे जाहीर केल्याने हे भांडण विकोपाला गेल्याचे गेले आहे. जाणून घेऊया चीन का गिळू पाहतोय तैवान?

भांडण का आणि केव्हापासून?

१९४० च्या दशकात चीनपासून तैवान वेगळा झाला. पण, तैवान आपलाच भाग असल्याचे चीन अजूनही ठासून सांगतो आहे. हा भाग परत मिळवण्यासाठी आपण बळाचाही वापर करू, अशी धमकीही चीनने दिली आहे. केरळ राज्यापेक्षाही छोट्या आकाराचा असलेला तैवान देश लोकशाहीप्रधान देश आहे. त्यांची स्वतंत्र राज्यघटना आहे. ३ लाख सैनिकही तैवानकडे आहेत. पण ते चीनविरोधात कधीच पुरेसे ठरणार नाहीत.

आता वाद का पेटला?

गेल्या आठवड्यात सलग चार दिवस चीनची १५० हून अधिक लढाऊ विमाने तैवानच्या हद्दीतून टेहळणी करून आली आहेत.

येत्या काळात तैवानविरोधात युद्ध करायचे असल्यास त्या देशाची तयारी काय आहे, हे पाहण्याची चीनची रणनिती आहे. तैवानला ही बाब खटकत आहे.

आपल्या संरक्षण क्षेत्रातील ही घसखोरी आपण खपवून घेणार नाही, असा पवित्रा तैवानने घेतला आहे. त्यामुळे तैवानने येत्या चार वर्षांत संरक्षण क्षेत्रावरील खर्च अनेक पटींनी वाढवण्याचा विचार केला आहे.

अमेरिका तैवानला साथ देईल?

तैवानच्या सुरक्षेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे काही महिन्यांपूर्वीच अमेरिकेने म्हटले होते. त्यामुळे गरज पडल्यास तैवानला युद्धसामुग्री पुरवण्यासही अमेरिका मागेपुढे पाहणार नाही.

चीनला एकटे पाडण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी अमेरिका करू शकते. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि जपानही तैवानच्या बाजूने उभे राहू शकतात.

(सहायक संपादक, लोकमत)

pavan.deshpande@lokmat.com