शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने भागवली गावाची तहान

By admin | Updated: September 19, 2015 23:05 IST

मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो...

- लक्ष्मण मोरे, पुणे

मराठवाड्यातील दुष्काळाच्या बातम्यांमुळे एक तरुण अस्वस्थ होतो... पावसाने दगा दिला, पण आपण तर या लोकांची साथ करू शकतो, असा विचार त्याच्या डोक्यात येतो... एका गावाला पिण्यासाठी पाणीच नाही, अशी माहिती त्याला कळते. अन् स्वत:च्या पगारातून पैसे देत हा तरुण गावासाठी महिनाभर पाण्याचा टँकर सुरू करण्याची जबाबदारी घेतो. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर अनेक जण आपापल्या परीने मदतीसाठी पुढे येत आहेत. विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. ४०वर्षीय नेरकर पुण्यातील नऱ्हे येथील एका कंपनीत वित्त विभागात व्यवस्थापक आहेत. दुष्काळाच्या बातम्यांनी ते व्यथित झाले. काहीतरी केले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. दुष्काळग्रस्तांसाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी कार्यालयातील सहकाऱ्यांकडेही विचारणा केली. तेव्हा जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पारनेर गावाला पिण्यासाठी पाणीच नसल्याची माहिती त्यांना समजली. त्यांनी तातडीने पारनेरमधील विजयकुमार लाहोटी यांचा दूरध्वनी क्रमांक मिळवून संपर्क साधला. सुरुवातीला गावात धान्य, चारा पाठविण्याची त्यांनी तयारी दर्शविली. परंतु धान्यापेक्षा पाणी फार महत्त्वाचे आहे, असे लाहोटी यांनी सांगितले. त्यावर नेरकरांनी एक महिनाभर गावाला पाणी देण्याचे वचन दिले. गावात लगेच टँकर सुरू करा, असे सांगत त्यांनी लाहोटी यांच्या बँक खात्यावर पहिल्याच दिवशी साडेसात हजार रुपये जमादेखील केले. त्यानंतर लगेच गावात टँकर आला. १५ दिवसांपासून टँकरद्वारे पारनेरकरांची तहान भागविली जात आहे. आपल्यापर्यंत पोहोचणारे पाणी कोणाकडून येते, याची अनेक गावकऱ्यांना माहितीही नाही.- नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मोहीम उघडली आहे. त्याच धर्तीवर विशाल अशोक नेरकर यांनीही असाच एक छोटासा प्रयत्न केला आहे. पारनेरमध्ये पाण्याचा प्रश्न बिकट आहे. लोकांना आणि जनावरांना प्यायला पाणी नाही. विशाल नेरकरांनी दिलेली भेट अनमोल आहे. दररोज सात हजार लीटर पाणी गावामध्ये टँकरद्वारे दिले जाते. प्रत्येक गल्लीमध्ये एक दिवसाआड पाण्याचा टँकर पाठवून लोकांना समप्रमाणात पाण्याचे वाटप केले जात आहे. - विजयकुमार लाहोटी, पारनेर, जि. जालनामदत करण्यासाठी फार काही भव्यदिव्य करण्याची आवश्यकता नाही. कोणतीही यंत्रणा सोबतीला नसली, तरी आपल्या परीने छोटी मदत करता येते. दुष्काळग्रस्तही आपलेच बांधव आहेत. त्यांचे दु:ख सर्वांनी थोडेथोडे वाटून घेतले तर ते कमी होईल. - विशाल नेरकर