शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

‘तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील’

By admin | Updated: September 18, 2015 00:54 IST

पानसरे हत्या प्रकरण : समीरच्या जन्मकुंडलीतील भाकित

एकनाथ पाटील - कोल्हापूर  १९९८ पासून ‘सनातन’ विचारांच्या प्रभावाखाली आलेल्या समीर गायकवाड याची जन्मकुंडली कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागली आहे. त्या कुंडलीमध्ये मुंबईतील एका ज्योतिषाने ‘तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील,’ असे भाकित व्यक्त केले आहे. ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांची माहिती एकत्रित करणे, ती संघटनेला पुरविणे येथून त्याची सुरुवात झाल्याचे काही महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तो पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असला तरी पानसरे हत्येमध्ये त्याचा अतिजवळचा सहभाग असल्याचे पोलिसांचे ठाम मत आहे. पानसरे यांच्या हत्येच्या तपासामध्ये पोलिसांची २० पथके सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैयक्तिक व आर्थिक व्यवहार, आदी विषयांवर रात्रं-दिवस काम करत होती. त्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तपास यंत्रणेचा अवलंब केला होता. नातेवाईक, जवळचे कार्यकर्ते, सराईत गुन्हेगार, आदींकडे वारंवार विचारपूस केली जात होती. प्रसंगी महाराष्ट्र-कर्नाटकातील सराईत गुन्हेगारांना ‘खाकीचा प्रसाद’ही खावा लागला. आतापर्यंत पोलिसांनी दोन कोटी मोबाईल कॉल डिटेल्सचीही तपासणी केली. महाराष्ट्र-कर्नाटकात काही पथके तळ ठोकून होती. या संपूर्ण तपासामध्ये सुरुवातीपासून पोलिसांचा ‘सनातन’चा कार्यकर्ता समीर गायकवाड याच्यावर संशय होता.यापूर्वीही त्याला चौकशीसाठी ताब्यात घेऊन सोडून दिले होते. त्यामुळे त्याला पोलीस मागावर असल्याची चाहूल लागली नव्हती. यावेळी पोलिसांच्या हाती रॅम्बो चाकू, ‘सनातन’ धर्माची २० पुस्तके, कॅप, भित्तीपत्रके, हिशेबाच्या पावत्या, लग्नपत्रिका, बँकेचे पासबुक, आदी साहित्य मिळून आले. त्यामध्ये पोलिसांना त्याची ‘जन्मकुंडली’ मिळाली. त्यामध्ये ज्योतिषाने ‘तू एक दिवस साहसपूर्ण काम करशील’ असे लिहिल्याचे निदर्शनास आले. ज्योतिषाने लिहिलेल्या जन्मकुंडलीचे भविष्य पानसरे हत्येच्या घटनेने तंतोतंत खरे ठरत आहे. हे पाहून पोलिसांनाही धक्का बसला. त्याची वैयक्तिक डायरीही पोलिसांच्या हाती लागली आहे. ती चाळली असता त्यामध्ये धर्माचे काम कसे चालते, याची माहिती लिहिली आहे. गायकवाड याचा संपूर्ण परिवार सनातन विचारांचा असल्याने तो कट्टर साधक असल्याचे पोलीस तपासात दिसून आले आहे.