योगेंद्र यादव, नवीन यांचा ‘आप’च्या पदांचा राजीनामा

By Admin | Updated: May 31, 2014 23:10 IST2014-05-31T23:10:48+5:302014-05-31T23:10:48+5:30

‘आप’चे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि नवीन जयहिंद यांनी आज शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिल़े

Yogendra Yadav, Navin's resignation | योगेंद्र यादव, नवीन यांचा ‘आप’च्या पदांचा राजीनामा

योगेंद्र यादव, नवीन यांचा ‘आप’च्या पदांचा राजीनामा

>नवी दिल्ली : ताज्या लोकसभा निवडणुकीत हरियाणात आम आदमी पार्टीच्या दारुण पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत ‘आप’चे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव आणि नवीन जयहिंद यांनी आज शनिवारी पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामे दिल़े
आप प्रवक्ते व दिल्ली शाखेचे सचिव दिलीप पांडे यांनी या वृत्तास दुजोरा दिला़ योगेंद्र यादव आणि हरियाणा प्रदेश संयोजक नवीन जयहिंद यांनी अनुक्रमे पक्षाची राजकीय व्यवहार कमिटी(पीएसी) आणि राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी सांगितल़े या पदांचे राजीनामे दिले असले तरी त्यांनी पक्ष सोडलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल़े यादव व जयहिंद यांच्या राजीनाम्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पुढील बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केल़े
यादव व जयहिंद यांच्यातील मतभेद समोर आल्यानंतर दोघांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती़ यादव हरियाणाचे प्रभारी आहेत तर जयहिंद प्रदेश संयोजक आहेत़ दोघांनीही अनुक्रमे गुडगाव व रोहतकमधून लोकसभा निवडणूक लढली होती़ तथापि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले           होत़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
- मी आम आदमी पार्टी सोडली, हे वृत्त अफवा आह़े मी पूर्णपणो पक्षासोबत आहे आणि आधीपेक्षा आणखी कष्ट उपसून पक्ष उभा करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे योगेन्द्र यादव यांनी स्पष्ट केल़े पीएसीचा राजीनामा का दिला? असे विचारले असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला़

Web Title: Yogendra Yadav, Navin's resignation