शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र सरकार उभारणार योगा विद्यापीठ

By admin | Updated: June 20, 2015 11:32 IST

योगविद्येच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावू शकणा-या आणि योगाचे प्रमाणिकरण करू शकणा-या महत्त्वाकांक्षी योगा विद्यापीठाचा पाया महाराष्ट्रात रचला जाईल अशी चिन्हे आहेत

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - योगविद्येच्या प्रसारात महत्त्वाची भूमिका बजावू शकणा-या आणि योगाचे प्रमाणिकरण करू शकणा-या महत्त्वाकांक्षी योगा विद्यापीठाचा पाया महाराष्ट्रात रचला जाईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे जसं टेनिससाठी विम्बल्डन आहे, क्रिकेटसाठी लॉर्ड्स आहे त्याप्रमाणे योगासाठी महाराष्ट्र असेल अशी भूमिका राज्य सरकार घेत आहे. सध्या वेगवेगळ्या संस्था योगा शिकवतात त्यांना एका छत्राखाली आणणे, प्रमाणिकरण करणे आणि सगळ्या शाखांमध्ये समन्वय साधणे या विद्यापीठाच्या माध्यमातून शक्य होईल अशी ही संकल्पना आहे.

जगाने योगा स्वीकारला असताना मध्यवर्ती संस्थेची गरज असल्याचे सांगत या विद्यापीठासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे सहाय्यक श्रीपाद ढेकणे यांनी सांगितले.
तावडे यांनी योगशिक्षण देणा-या राज्यातल्या सगळ्या प्रमुख संस्थांना एकत्र येण्याचे निमंत्रण दिले असून समन्वयाचे काम या क्षेत्रातले तज्ज्ञ उदय देशपांडे करत आहेत. येत्या काही दिवसांमध्ये जागा व विद्यापीठाचे स्वरुप याबाबत चर्चा करण्यात येईल असे देशपांडे म्हणाले. आंतरराष्ट्रीय योगा डे च्या तयारीचे काम सुरू असताना विद्यापीठाची संकल्पना पुढे आल्याचे देशपांडे म्हणाले.
विद्यापीठ झाल्यावर सरकामान्य पदविका, डिग्री असे अनेक अभ्यासक्रम सुरू होतील. सध्या असे अभ्यासक्रम विविध सस्थांचे आहेत, परंतु ते सरकारमान्य नाहीत. सध्या योगाची विविध तंत्रे असून प्रत्येक संस्था आपलं तंत्र चांगलं असल्याचा दावा करते. परंतु, विदयापीठाच्या माध्यमातून या सगळ्यात सुसूत्रता येईल अशी अपेक्षा आहे.