शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

वाईचे जवान सूरज मोहिते शहीद

By admin | Updated: March 21, 2015 00:19 IST

पंधरा दिवसांपूर्वीच सुटीचा आनंद

वाई : येथील जवान सूरज सर्जेराव मोहिते (वय २४, रा़ अंबिकानगर सिद्धनाथवाडी वाई, मूळ रा. गणेशवाडी-सरताळे, ता. जावळी) हे जम्मू काश्मीरमधील कथुआ येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाले. या घटनेत भारताच्या दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली.सिद्धनाथवाडीतील सूरज मोहिते हे दोन वर्षांपूर्वी केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झाले होते. त्यांनी दीड वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या सहा महिन्यांपासून ते जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर कर्तव्य बजावत होेते़ ते अविवाहित असून, त्यांचा मोठा भाऊ पोलीस दलात अलिबाग येथे कार्यरत आहे़ त्यांच्या मातोश्री उषा सर्जेराव मोहिते सिद्धनाथवाडी येथे वास्तव्यास आहेत. सूरज मोहिते हुतात्मा झाल्याची बातमी समजताच वाई शहरावर शोककळा पसरली़ त्यांच्यावर वाई येथील सिद्धनाथवाडीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. पंधरा दिवसांपूर्वीच सुटीचा आनंद सूरज यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेतले. त्यांचे प्राथमिक शिक्षण मूळ गावी सरताळे येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी किसन वीर महाविद्यालयात घेतले. महाविद्यालयात त्यांनी बॉक्सिंगमध्ये प्रावीण्य मिळवून राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली. राष्ट्रीय तसेच राज्यस्तर स्पर्धेत वीस पदके मिळविली़ देशसेवेचे त्यांचे स्वप्न असल्याने केंद्रीय राखीव पोलीस दलात ते भरती झाले. पंधरा दिवसांपूर्वीच सुटी संपवून ते पुन्हा सेवेत रुजू झाले होते./ संसदेत पडसाद - वृत्त १०