यंदा बाप्पांना ख:या दागिन्यांचा साज

By Admin | Updated: August 20, 2014 23:54 IST2014-08-20T23:54:40+5:302014-08-20T23:54:40+5:30

यंदाचे खास आकर्षण म्हणजे गणरायांच्या मूर्तीना ऑर्डरनुसार चढविला जात असलेला ख:या दागिन्यांचा साज. आजवर गणरायाच्या मूर्तीचे दागिने केवळ सोनेरी अथवा चंदेरी रंगाने रंगविलेले असत.

This year's funeral for the children | यंदा बाप्पांना ख:या दागिन्यांचा साज

यंदा बाप्पांना ख:या दागिन्यांचा साज

नंदकुमार टेणी - ठाणो
यंदाचे खास आकर्षण म्हणजे गणरायांच्या मूर्तीना ऑर्डरनुसार चढविला जात असलेला ख:या दागिन्यांचा साज. आजवर गणरायाच्या मूर्तीचे दागिने केवळ सोनेरी अथवा चंदेरी रंगाने रंगविलेले असत. परंतु आता टिकल्या, खडे, आर्टिफिशीयल डायमंड, धातूचा वापर या सजावटीसाठी होतो आहे. मोती, मणी याचाही गरजेनुसार वापर केला जातो आहे. त्यामुळे मूर्तीच्या सौंदर्यात मोठी भर पडते आहे. 
गणोशमूर्तीची विक्री करणा:या स्टॉलधारकांनी अशा कारागिरांना आपल्या पदरी नोकरी अथवा पीस रेट तत्त्वावर नियुक्त केले आहे. एक मूर्ती अशा रीतीने सजवून ठेवलेली असते. मूर्ती घ्यायला येणारे ग्राहक तिच्या सौंदर्याने मोहित होतात व तिची किंमत विचारतात तेव्हा ती त्याच आकाराच्या सर्वसाधारण मूर्तीच्या दुप्पट ते अडीचपट असते. हा फरक कशामुळे असे विचारले असता, मूर्तीची किंमत सारखीच आहे. एक्स्ट्रॉ किंमत आहे ती सजावटीची असा खुलासा केला जातो. तुमची इच्छा असल्यास तुम्ही पसंत केलेल्या मूर्तीलाही असे सजवून दिले जाईल. फक्त त्याचे पैसे सजावटीच्या प्रमाणानुसार अतिरिक्त द्यावे लागतील, असे सांगितले जाते. सजावटीत डायमंड, मणी, मोती, टिकल्या, जर, धातूच्या तारा, माळा याच्या वापराचे प्रमाण जितके मोठे तितकी सजावटीची किंमत मोठी असते. काही मोठय़ा मूर्तीच्या बाबतीत कर्णफुले, मुकूट, हातातील आयुधे ही खरोखरीची वापरली जातात त्यामुळे ती मूर्ती खरोखरीची वाटू लागते. सर्वसाधारण मूर्तीपेक्षा ती अधिक उठावदार आणि सजीव भासते. अशा कारागिराला एक मूर्ती सजवायला तीन ते चार तास लागतात. त्यासाठी अॅरल्डाईट, स्टीकफास्ट, फेविक्वीक याचा वापर केला जातो. बारीक चिमटे, बारीक हॅण्डड्रील, पातळ पटाशी आणि स्पंज प्रेस या आयुधांचा वापर करून कारागीर ही सजावट करीत असतात. 
एखादी मूर्ती भव्य आणि खूप सजावटीची असेल तर त्यासाठी प्रसंगी दोन-तीन दिवसही लागू शकतात. सध्या हा ट्रेण्ड नवा असल्याने महाग आहे. कालांतराने मूर्तिकारच अशा मूर्ती सजवून बाजारात आणतील व त्याची किंमत तुलनेने थोडी जास्त असेल असा अंदाज मूर्ती विक्रेत्यांनी वर्तविला आहे.

 

Web Title: This year's funeral for the children