शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलाची पूजा वारकरी परंपरेनुसार व्हावी

By admin | Updated: May 12, 2014 02:56 IST

विठ्ठलाची पूजा वारकरी परंपरेनुसार व्हावी त्यात देवस्थान समितीची मनमानी नको, असा इशारा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने दिला आहे.

मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठ्ठलाची पूजा कोणी करावी, कशी करावी आणि कोणी करू नये यावरून जाणीवपूर्वक वाद निर्माण केला जात आहे, तो निषेधार्थ आहे. त्यामुळे विठ्ठलाची पूजा वारकरी परंपरेनुसार व्हावी त्यात देवस्थान समितीची मनमानी नको, असा इशारा महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाने दिला आहे.कोणीही विठ्ठलाच्या नित्यपूजेचे राजकारण करू नये. देवस्थान समितीचे काम मंदिराचे व्यवस्थापन पाहण्याचे आहे. मनमानी करून तेथील वारकरी संप्रदायाची प्रथा, परंपरा, धार्मिकता मोडण्याचा अधिकार समितीला नाही. त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या प्रथा-परंपरेनुसार विठ्ठलाची नित्यपूजा झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे उपाध्यक्ष ह.भ.प. रामेश्वर शास्त्री महाराज यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. वारकरी महामंडळाने विठ्ठल मंदिर बडव्यांच्या ताब्यातून सोडवण्यासाठी राज्यभर आंदोलन केले होते. वारकरी महामंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय देवस्थान समितीने कोणताही निर्णय घेऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.सध्या विठ्ठलाची पूजा विशिष्ट लोकांना करू द्यावी, तेथे महिला पुजारी असावेत, पुजार्‍यांनी धोतर न घालता पांढरी विजार, पांढरा शर्ट व टोपी घालावी, मंदिरात पुरुषसुक्ताचे वा वेदमंत्र म्हणू नयेत, आदी मनाला येईल तशा मागण्या केल्या जात आहेत. धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धती ठरलेली असते. प्रथा-परंपरेनुसारच विठ्ठलाची पूजा झाली पाहिजे.ज्या वारकरी महामंडळाने बडव्यांची मनमानी संपवण्यासाठी आंदोलन केले, त्या वारकरी महामंडळाला देवस्थान समिती विश्वासात का घेत नाही, यात राजकीय हितसंबंध दडलेला आहे का, देवस्थान समितीचे सर्व विश्वस्त हे वारकरी असले पाहिजेत, तर देवस्थानाचे पावित्र्य जपण्याचा योग्य निर्णय घेऊ शकतील.(प्रतिनिधी)...नाहीतर पुन्हा आंदोलन!विठ्ठलाची पूजा करणारा पुजारी निर्व्यसनी, मासांहारयुक्त, सदाचारी, माळकरी, वारकरी, विठ्ठलाचा भक्त आणि विठ्ठलाच्या पूजेचा पाच वर्षे अनुभव असला पाहिजे. यामध्ये कोणत्या जातीच्या लोकांनी पूजा करून नये याला विरोध नाही. त्यामुळे देवस्थान समितीने राजकारण करून विठ्ठलाची अवहेलना होईल, अशी कोणतीही कृती करू नये अन्यथा वारकर्‍यांना पुन्हा एकदा तीव्र आंदोलन पुकारावे लागेल.