शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

बाललैंगिक अत्याचारांबाबत महिला बालविकास आणि अधिकारी बेफीकीर

By admin | Updated: May 31, 2014 22:12 IST

कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या डॉ. निलम गो-हे यांनी केली.

पुणे : चंद्रभागा ट्रस्टच्या आश्रमशाळेमध्ये अजित दाभोळकर आणि ललिता तोंडे यांच्याकडून गेल्या सहा वर्षांपासून सुरु असलेल्या मुलांच्या लैंगिक शोषणाच्या घृणास्पद प्रकाराकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करण्यात आले. याला रायगड जिल्ह्यातील बालविकास अधिकारी आणि कर्जत पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिका-यांची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या डॉ. निलम गो-हे यांनी केली. याबाबतचे निवेदन गृहमंत्र्यांना दिल्याचे यावेळी गो-हे यांनी सांगितले.रायगड जिल्ह्यातील टाकवे गावामध्ये चंद्रभागा ट्रस्टच्यावतीने चालवल्या जाणा-या आश्रमशाळेमध्ये मुलामुलींचे लैंगिक शोषण होत असल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दाभोळकर आणि तोंडे हिला अटक करण्यात आली आहे. ललिता तोंडे हिचा पती भगवान तोंडे याचा २० जून २००२ रोजी संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूची चौकशी सीआयडीमार्फत व्हावी अशी मागश्णी त्यांनी केली. दाभोळकरच्या गैरकृत्यांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्ष करण्यात असून यामागे रायगड जिल्ह्यातील मोठी व्यक्ती असल्याचा आरोपही गो-हे यांनी केला. यावेळी भगवान तोंडेंचे भाऊ नारायण, बहीण राधिका भोकरे, संजय खोपडे उपस्थित होते. गो-हे म्हणाल्या की, आश्रमशाळेत चालणा-या गैरप्रकारांची माहिती भगवान तोंडे यांना झाली होती. तसेच दाभोळकर आणि ललिता यांच्यातील अनैतिक संबंधातूनच तोंडे यांचा खून करण्यात आला. रायगड पोलिसांनी २००९ मध्ये कोणतीही कल्पना न देता अचानक खुनाचा तपास बंद केला. त्याचवेळी पोलिसांनी ट्रस्टची तपासणी केली असती तर सर्वच गैरप्रकार उघडकीस आले असते. स्थानिक पोलीस अधिक्षक आणि काही अधिका-यांची दाभोळकरचे संबंध असल्यामुळे त्याला वाचवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. खुनाच्या तपासातील तत्कालीन तपासी अधिका-यांची चौकशी करण्यात यावी. तसेच दाभोळकर व ललिताला जामिन मिळू नये. पिडीत मुलामुलींचे जबाब कलम १६४ नुसार लेखी स्वरुपात घेण्यात यावेत अशी मागणी गो-हे यांनी केली,.