शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

दोघा चिमुकल्यांसह महिलेने घेतला गळफास

By admin | Updated: January 1, 2017 17:28 IST

दोन चिमुकल्यांसह महिलेने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण, ता. नंदुरबार येथे घडली.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. 1 - दोन चिमुकल्यांसह महिलेने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण, ता. नंदुरबार येथे घडली. महिलेच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.सिंदगव्हाण येथील शेतकरी मुरलीधर पाटील (३५) हे पत्नी व दोन मुलांसह राहतात. सकाळी ते शेतात गेले असता आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी प्रतिभा (३०), खुशी (आठ वर्ष) व चेतन (सहा वर्ष) हे शेजारच्या लोकांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. तातडीने तालुका पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर तिघांचे मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. प्रतिभा यांच्या माहेरी ही घटना कळविण्यात आली. आई, वडील व इतर नातेवाईक आल्यावर त्यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. पती मुरलीधर हा नेहमीच तिच्यामागे पैशांसाठी तगादा लावत होता. शेतीसाठी वेळोवेळी पैसे देखील दिल्याचे मयत महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी मुरलीधर यास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नव्हता.