शहरं
Join us  
Trending Stories
1
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
2
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
3
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
4
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
5
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
6
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
7
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
8
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
9
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
10
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
11
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
12
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
13
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
14
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
15
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
16
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
17
स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत स्टेजवर असताना अभिनेत्रीने केली 'ती' कृती; Video होतोय व्हायरल
18
Ritual: महत्त्वाच्या कामाला जाताना 'दही-साखर' का खातात? केवळ श्रद्धा की विज्ञानाची जोड?
19
PM मोदी सर्वांसमोर माखनलाल सरकार यांच्या पाया पडले; या क्षणाबाबत त्यांची पत्नी म्हणते...
20
Mother's Day 2026 Wishes: जागतिक मातृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मातृत्त्वाचा सोहळा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लस सर्वसामान्यांना मोफत मिळणार का?; मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2021 12:55 IST

Corona Vaccination: कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात; मुख्यमंत्री ठाकरेंच्या उपस्थितीत शुभारंभ

मुंबई: देश जवळपास गेल्या वर्षभरपासून कोरोना संकटाचा सामना करत आहे. देशात तब्बल १ कोटीहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली. यातील ९५ लाखांहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली. तर जवळपास दीड लाख लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना संकटावर पूर्णपणे मात करण्यासाठी आजपासून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला प्रारंभ केला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलात कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली.

कोरोना संकटात आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचं योगदान दिलं. त्यांना कोरोना लसीकरणात प्राधान्य देण्यात येईल. कोरोना संकटाचा सामना करणाऱ्या फ्रंटलाईन वर्कर्सना आजपासून लस देण्यास सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं. कोरोना लस सर्वसामान्य नागरिकांना मोफत मिळणार का, असा प्रश्न यावेळी मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला. त्यावर आरोग्य कर्मचाऱ्यांना लस मोफत मिळणार आहे. सर्वसामान्यांना लस मोफत मिळणार की नाही, याबद्दलचा निर्णय अद्याप केंद्र सरकारनं घेतलेला नाही. केंद्रानं यासंदर्भातला निर्णय घेतला की मग आम्ही निर्णय घेऊ, असं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं.



कोरोना लसीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे सरकार नियंत्रित आहे. त्यामुळे यामध्ये कोणताही भ्रष्टाचार किंवा काळाबाजार होणार नाही. सध्याच्या घडीला दोन कंपन्यांच्या लसींच्या वापरास परवानगी मिळाली आहे. आणखी एक-दोन कंपन्या रांगेत आहेत. त्यांच्या लसींच्या वापरास लवकरच परवानगी मिळू शकते. तसं झाल्यास राज्यांना मिळणाऱ्या लसींचा कोटा वाढेल आणि लसीकरणाला आणखी वेग येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले. केंद्रानं प्रत्येक राज्याला कोरोना लसीचा कोटा ठरवून दिला आहे. पण यावरून मला राजकारण करायचं नाही, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या लसींना मान्यता द्यायची याचा निर्णय केंद्र सरकार घेईल. पण लस आली असली तरी बेफिकीर राहू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. लसीकरणास सुरुवात झाली आहे. पण म्हणून नागरिकांनी बेजबाबदारपणे वागू नये. मास्क वापरणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग राखणं ही कोरोनाला रोखण्याची त्रिसुत्री आहे. ती आपण लक्षात ठेवायला हवी, याची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCorona vaccineकोरोनाची लस