शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीसोबत जाणार नाही

By admin | Updated: September 27, 2014 04:46 IST

आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले

नागपूर : आम्ही कधीही राष्ट्रवादीसोबत नव्हतो, आताही नाही व पुढेही जाणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या काँग्रेस व शिवसेनेकडून होत असलेल्या आरोपांवर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केलेले घोटाळे भाजपानेच बाहेर काढले, असे सांगत टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असा टोला त्यांनी लगावला.फडणवीस यांच्यासह भाजपा उमेदवारांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी फडणवीस यांनी शिवसेनेवर थेट टीका करणे टाळले पण वेगवेगळी उदाहरणे देत युती तोडण्यासाठी शिवसेना कशी जबाबदार हे अप्रत्यक्षपणे सांगण्यासही ते विसरले नाहीत. फडणवीस म्हणाले, सिंचन घोटाळ्यासह राष्ट्रवादीचे इतर घोटाळे भाजपानेच उकरून काढले. विधानसभेत आम्ही संघर्ष केला. सभागृहाच्या कामकाजाचे जुने संदर्भ पाहिले तर मौन कुणी बाळगले होते, हे स्पष्ट होईल. काँग्रेसकडे आता आरोपांशिवाय काहिही राहिलेले नाही. भाजपाची राष्ट्रवादीशी कोणत्याही परिस्थितीत युती होऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेचे समर्थन घेण्यासही त्यांनी नकार दिला. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार असते त्याच पक्षाचे सरकार राज्यात आले तर राज्याचे अधिक भले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून भाजपाला मतदान करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुसऱ्या पक्षातील बरेच नेते भाजपामध्ये येण्यास उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पक्षाचे संसदीय मंडळ ठरवेल, असे सांगत त्यांनी यासंदर्भातील प्रश्नाला बगल दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राजकीय नसतो असे सांगत परिवर्तन घडले पाहिजे असे जेव्हा स्वयंसेवकांना वाटते तेव्हा ते बाहेर पडतात, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)