शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांचे सत्कार समारंभ कशासाठी?

By admin | Updated: August 28, 2014 02:08 IST

शासनाची पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही शासक ीय कर्मचारी वा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप समारंभानिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. परंतु जिल्हा

जिल्हा परिषद : बांधकाम विभागाने नियम धाब्यावर बसवलेनागपूर : शासनाची पूर्व मंजुरी मिळाल्याशिवाय कोणत्याही शासक ीय कर्मचारी वा अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप समारंभानिमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने नियम धाब्यावर बसवून निरोप समारंभाचा धडाका लावला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक)नियम १९७९ च्या नियम १३ नुसार शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ वा निरोप निमित्ताने कार्यक्र माचे आयोजन करता येत नाही. या नियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विभाग प्रमुखांवर आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या कर्मचारी वा अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही करण्याचे शासन निर्देश आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण गाडीगोने यांच्या सहमतीनेच असे सत्कार समारंभ आयोजित होत असल्याने कार्यवाही कोण करणार. असा प्रश्न निर्माण झाला आहे. सावनेर पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील अधिकारी सेवानिवृत्त होत आहे. या निमित्ताने निरोप समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांवर निधी संकलनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या नावाखाली वसुली सुरू आहे. वर्गणी दिली नाही तर वरिष्ठ नाराज होतील म्हणून इच्छा नसतानाही कर्मचाऱ्यांना पैसे द्यावे लागत असल्याची व्यथा काही कर्मचाऱ्यांनी मांडली.अशा कार्यक्र म निमित्ताने गोळा करण्यात आलेल्या पैशाचा जमाखर्च ठेवला जात नाही. त्यामुळे कार्यक्र माच्या निमित्ताने नेमका किती निधी गोळा करण्यात आला, कार्यक्र मावर किती खर्च झाला. याचा हिशेब नसतो. गत काळात हिंगणा पंचायत समितीच्या बांधकाम विभागातील सहायक कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांची बदली झाल्यानिमित्ताने तर खंड विकास अधिकारी रामदास धांडे यांची पदोन्नती झाल्याने सदर भागातील हॉटेलमध्ये गाडीगोने यांच्या उपस्थितीत जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही पार्टी चांगलीच गाजली होती. असे असतानाही निरोप समारंभाचे कार्यक्र म थांबलेले नाही , हे विशेष.(प्रतिनिधी)